E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
नगर रस्त्यावरील अनधिकृत फलकाला अभय कोणाचे?
Wrutuja pandharpure
26 May 2025
पालिकेच्या अधिकार्यांची डोळेझाक; नागरिकांकडून संताप
पुणे
: गेल्या वर्षी पावसाळ्याच शहरातील काही भागात फलक पडण्याच्या घटना घडल्या होत्या. त्यानंतर पालिकेने अनधिकृत फलकावर कारवाईचे कडक धोरण स्वीकारले होते. परंतु राजकीय दबाव आणि फलक धारकांच्या संघटनेपुढे पालिकेने लोटांगण घातले होते. पुणेकरांच्या जीवाशी खेळ सुरुच ठेवल्याचे गेल्या चार दिवसांपूर्वी वाघोली, धानोरी-पोरवाल रोड आणि फुरसुंगीतील मंतरवाडी चौकात होर्डिंग्ज कोसळण्याच्या घटनेने सिध्द झाले आहे. शहरात नगर रस्त्यावर तब्बल ३५७ अनधिकृत फलक आहेत. मात्र त्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने नेमके याला अभय कोणाचे आहे, असा प्रश्न या भागातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.
शहरात फलक उभारण्यासाठी नियमावली जाहिर करण्यात आली आहे. मात्र अनेक ठिकाणी नियमावली धाब्यावर बसवून होर्डिंग उभे केले आहेत. मोक्याच्या ठिकाणी मोठ-मोठे होर्डिंग उभारण्यात आले आहेत. या होर्डिंगच्या माध्यमातून पालिकेला कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळते. पालिकेला द्यावे लागणारे शुल्क वाचविण्यासाठी अनधिकृत होर्डिंग उभारले जाते. मात्र या होर्डिंग्जवर कारवाई करण्याचे कोणतेही धाडस पालिकेच्या अधिकार्यांकडून दाखविले जात नाही. कारवाई टाळण्यासाठी क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकार्यांना महिन्याकाठी चिरीमिरी दिले जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अधिकार्यांना चिरीमिरी मिळत असल्यानेच कोणतीही कारवाई होत नाही, असे नागरिकांनी सांगितले. धानोरी- पोरवाल रस्त्यावर फलक कोसळण्याची घटना घडल्यानंतर नागरिकांना संताप शांत करण्यासाठी १०१ अनधिकृत फलकावर कारवाई केली आहे. मात्र २०२२ पासून तब्बल ३५७ अनधिकृत उभारण्यात आलेल्या होर्डिंग्ज उभारण्यात आले आहेत. या फलक धारकांवर कारवाई केली आहे. मात्र त्यांच्याकडून अद्याप दंड वसूल केलेला नाही. किंवा दंड वसूल केल्याची कोणतीही माहिती अधिकार्यांकडून दिली जात नाही, असा आरोप करुन या होर्डिंगला अभय का दिले जात आहे. असा नागरिकांना प्रश्न उपस्थित केला आहे.
नगर रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १५० हून अधिक अनधिकृत फलक असल्याचे सांगितले जाते. परंतु प्रत्यक्षात हा आकडा ३६७ च्या वर असल्याचे बोलले जात आहे. यावर मात्र अजूनही कोणतीही कारवाई झालेली नाही. या निष्क्रियतेमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. सहारा आटी कंपनी मार्फत झालेल्या थर्ड पार्टी पाहणीत या फलक अनधिकृत असल्याचे स्पष्ट झाले होते. काही फलक धारकांनी बनावट स्ट्रक्चरल प्रमाणपत्रे सादर केली आहेत. असा आरोप एका नागरिकाने केला आहे.
धोकादायक फलक अद्याप कोणतीही कार्यवाही नाही
पुण्यात मोठ्या प्रमाणात धोकादायक होर्डींग असताना देखील पालिकेच्या आकाशचिन्ह विभागाने या बाबत कोणतीही कारवाई केली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. मंगळवारी (दि.२०) धानोरी येथे वादळी वार्यामुळे एक फलक कोसळल्याची घटना घडली. या घटनेत कोणतीही हानी झाली नसली तरी यामुळे शहरातील होर्डींग व जाहिरात फलकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
या बैठकीच्या दुसर्याच दिवशी धानोरी येथे होर्डींग कोसळल्याने आकाशचिन्ह विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे.
शहरात फलकाच्या दुर्घटना घडू नयेत, यासाठी बैठक झाली असून दुर्घटना टाळण्यासाठीच्या सूचना दिल्या आहेत.
प्रशांत ठोंबरे, प्रमुख, आकाशचिन्ह व परवाना विभाग, महापालिका.
Related
Articles
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
लिप्यंतरामुळे मोडी लिपीच्या अभ्यासकांना प्रेरणा
14 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
लिप्यंतरामुळे मोडी लिपीच्या अभ्यासकांना प्रेरणा
14 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
लिप्यंतरामुळे मोडी लिपीच्या अभ्यासकांना प्रेरणा
14 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर सापडला
17 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
लिप्यंतरामुळे मोडी लिपीच्या अभ्यासकांना प्रेरणा
14 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !