नवी दिल्ली : गुप्तचर विभागाचे (आयबी) प्रमुख तपन कुमार डेका यांचा कार्यकाळ एक वर्षांनी वाढवण्यात आला आहे. आता ते जून २०२६ पर्यंत पदाचा कार्यभार पाहणार आहेत. कार्मिक मंत्रालयाने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. डेका हे १९८८ च्या बॅचचे हिमाचल प्रदेश केडरचे आयपीएस अधिकारी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने याबाबतचा निर्णय घेतला.जून २०२२ मध्ये डेका यांची आयबीचे प्रमुख म्हणून दोन वर्षांसाठी नियुक्ती झाली होती. त्यानंतर, एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती.
Fans
Followers