E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
आणखी दोन हेरांना अटक
Samruddhi Dhayagude
20 May 2025
एकूण संख्या १२; पंजाब, हरयाना, उत्तर प्रदेशात कारवाई
चंडीगढ/ लखनौ : पाकिस्तानसाठी हेरगिरी करणार्या १२ हेरांना पंजाब, हरयाना, उत्तर प्रदेशातून गेल्या दोन आठवड्यात अटक केली आहे. त्यापैकी सहा जणांना पंजाब आणि चौघांना हरयानातून अटक केली. सोमवारी उत्तरप्रदेश आणि हरयानात दोघांना अटक करण्यात आली. नूह पोलिस आणि केंद्रीय तपास संस्था (सीआयए) यांनी संयुक्तपणे कारवाई करुन आणखी एका पाकिस्तानी हेराला अटक केली आहे. दोन दिवसांपूर्वी राजका गावात अरमान याला अटक केल्यानंतर दुसर्या मोठ्या कारवाईत दुसरा हेर पकडला गेला आहे.
महमद तारीफ, असे त्याचे नाव आहे. तो नूह जिल्ह्यातील कांगरका गावचा रहिवासी आहे. लष्कराच्या हालचालीची गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत होता. पाकिस्तान उच्च आयुक्तालयाकडून त्याला त्यासाठी सिमकार्ड दिले होते, अशी कबुली त्याने दिली. या प्रकरणी तो आणि दोन पाकिस्तानी नागरिक असील बलोच आणि झफर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार छापा टाकून महमद तारीफला अटक केली आहे. अनेक नागरिकांना पाकिस्तानचा व्हिसा तो देत होता. पोलिस पथकाला पाहून त्याने मोबाइलमधील चॅट आणि अन्य माहिती नष्ट करण्याचा प्रयत्नही त्याने केला होता. मोबाइल फोन जप्त करण्यात आला आहे. पाकिस्तानी व्हॉट्स अॅप क्रमांक त्याने काढून टाकल्याचे उघड झाले आहे. आता त्याने कोणती लष्कराची छायाचित्रे, संवेदनशील माहिती पाठवली होती. याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. दोन सिमकार्डचा वापर करुन पाकिस्तानात संपकर्ं होता. या प्रकरणी त्याची ज्येष्ठ अधिकार्यांकडून सखोल चौकशी केली जात आहे.
दरम्यान, नूमान इलाही (वय २४) या आयएसआयच्या हस्तकाला देखील नुकतीच हरयानातील पानिपत जिल्ह्यात अटक करण्यात आली होती. तो संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याचे उघड झाले होत. त्याचे उत्तर प्रदेशातील कैरीना जिल्ह्यातील काही जणांच्या संपर्कात होता. तो एका कारखान्यात सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होता. पानिपतच्या हाली कॉलनीत तो बहीण आणि साडूसोबत राहात होता. १३ मार्च रोजी उत्तर प्रदेश दहशतवाद विरोधी पथकाने फिरोजपूर जिल्ह्यातील हजरतपूर येथील दारुगोळा कारखान्यावर छापा टाकला होता. तेव्हा संवेदनशील माहिती पाठवल्याप्रकरणी कर्मचार्यांना अटक केली होती. कारखान्याचा चार्जमन रवींद्र कुमार त्या मागे असल्याचे उघड झाले होते.
अन्य हेरांची नावे
यापूर्वी हरयानातील यूट्यूबर ज्योती मल्होत्राला अटक केली होती. तिचे पाकिस्नाच्या उच्च आयुक्तालयातील कर्मचारी दानिश याच्याशी संबंध होते.देवेंद्र सिंग ढिल्लो, अरमान, गजाला, यामिन महमद, महमद मुर्तजा अली, सुखबीर सिंग आणि कनबीर सिंग यांना हेरगिरी प्रकरणात अटक झाली होती. यापूर्वी चार मे रोजी पंजाब पोलिसांनी फलकशेर मासिह आणि सुरज मासीह यांना अटक केली होती. दोघेही अमृतसरच्या अंजाला गावचे रहिवाी आहे.
पाकिस्तानी हेराला उत्तर प्रदेशात अटक
लखनौ : पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयसाठी हेरगिरी करणार्या एका संशयिताला पोलिसांनी अटक केली. उत्तर प्रदेशातील रामपूर येथे उत्तर प्रदेश विशेष कृती दलाने छापा टाकून त्याला पकडले. शहजाद, असे त्याचे नाव असून तो रामपूरच्या टांडा येथील रहिवासी आहे. सीमावर्ती भागांत त्यांचा वावर होता. चोरटा व्यापार आणि संवेदनशील माहिती तो आयएसआयला देत असल्याचे उघड होताच मोरादाबाद येथील विशेष कृती दलाने कारवाई करुन त्याला अटक केली. त्याने वर्षभरात पाकिस्तानचा दौरा केला होता. सौंदर्यप्रसाधने, कापड, मसाल्याचे पदार्थ आणि अन्य वस्तूंचा चोरटा व्यापार करत होता. अटकेनंतर विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले असून त्यामध्ये हेरगिरी केल्याचा गुन्हाही आहे.
Related
Articles
प्राधान्यक्रम बाजारपेठांवर भारत-अमेरिकेत चर्चा
03 Jun 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
निसर्गछाया उपक्रम सर्वांसाठी खुला
05 Jun 2025
शिवराज्याभिषेक दिनी ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी
08 Jun 2025
कोलंबियात अध्यक्षपदाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला
09 Jun 2025
भारतीय महिला फलंदाज स्मृती मंधाना हिने घेतले केसरीवाडा गणपती बाप्पाचे दर्शन
05 Jun 2025
प्राधान्यक्रम बाजारपेठांवर भारत-अमेरिकेत चर्चा
03 Jun 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
निसर्गछाया उपक्रम सर्वांसाठी खुला
05 Jun 2025
शिवराज्याभिषेक दिनी ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी
08 Jun 2025
कोलंबियात अध्यक्षपदाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला
09 Jun 2025
भारतीय महिला फलंदाज स्मृती मंधाना हिने घेतले केसरीवाडा गणपती बाप्पाचे दर्शन
05 Jun 2025
प्राधान्यक्रम बाजारपेठांवर भारत-अमेरिकेत चर्चा
03 Jun 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
निसर्गछाया उपक्रम सर्वांसाठी खुला
05 Jun 2025
शिवराज्याभिषेक दिनी ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी
08 Jun 2025
कोलंबियात अध्यक्षपदाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला
09 Jun 2025
भारतीय महिला फलंदाज स्मृती मंधाना हिने घेतले केसरीवाडा गणपती बाप्पाचे दर्शन
05 Jun 2025
प्राधान्यक्रम बाजारपेठांवर भारत-अमेरिकेत चर्चा
03 Jun 2025
सिंध प्रांतात हिंदू धर्मीयांची निदर्शने
03 Jun 2025
निसर्गछाया उपक्रम सर्वांसाठी खुला
05 Jun 2025
शिवराज्याभिषेक दिनी ५१ फूट शिवशक राजदंड स्वराज्यगुढी
08 Jun 2025
कोलंबियात अध्यक्षपदाच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला
09 Jun 2025
भारतीय महिला फलंदाज स्मृती मंधाना हिने घेतले केसरीवाडा गणपती बाप्पाचे दर्शन
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
4
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
5
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
6
अॅपल करणार भारतात गुंतवणूक