E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
इंद्रायणी काठावरील ३६ बंगले पाडले
Samruddhi Dhayagude
18 May 2025
निळ्या पूररेषेवरील बेकायदा बांधकाम उद्ध्वस्त
पिंपरी
: पिंपरी चिंचवड महापालिकेच्या क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणार्या चिखली येथील गट क्रमांक ९० मधील इंद्रायणी नदीलगतच्या निळ्या पूररेषेत उभारण्यात आलेले ३६ बेकायदा बंगले पाडण्यात आले आहेत १.८ एकर भूभागावरील सुमारे ६३,९७० चौरस फूट क्षेत्रफळातील बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली आहेत. महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी कारवाईनंतर घटनास्थळाची पाहणी केली.
शहराच्या बाजूने जाणार्या इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेच्या आतील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्याचा आदेश हरित लवादने दिला होता. या विरोधात रहिवाश्यांनी सर्वोच्च न्यालयात धाव घेतली होती. मात्र न्यायालयाने हरित लवादचा निर्णय कायम ठेवला. त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, शहर अभियंता मकरंद निकम, उपायुक्त मनोज लोणकर, सीताराम बहुरे, राजेश आगळे, सह शहर अभियंता नितीन देशमुख, संजय खाबडे, क्षेत्रीय अधिकारी शीतल वाकडे, अमित पंडित, अजिंक्य येळे, पूजा दूधनाळे, श्रीकांत कोळप, किशोर ननावरे, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, महेश वाघमोडे, नाना मोरे, कार्यकारी अभियंता सूर्यकांत मोहिते, सुनील बागवानी, विजय सोनवणे, लक्ष्मीकांत कोल्हे, विजय वायकर, शिवराज वाडकर, सुनीलदत्त नरोटे, यांच्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांनी कारवाई केली.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे पोलिस उपआयुक्त डॉ. शिवाजी पवार, बापूसाहेब बांगर, साहाय्यक पोलिस आयुक्त अनिल कोळी, राजेंद्रसिंह गौर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली परिसरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेच्या आत बांधण्यात आलेल्या आरसीसी बांधकामांमुळे पावसाळ्यात नदीला पूर येतो. त्यामुळे तेथील नागरिकांना यांचा मोठा फटका बसू शकतो. त्यामुळे नदी काठची बेकायदा बांधकामे हटविण्यासाटी बांधकाम परवानगी व अनधिकृत बांधकाम नियंत्रण विभाग आणि धडक कारवाई पथकांमार्फत ३६ बंगल्यावर कारवाई करण्यात आली.
कारवाईमध्ये सहभागी यंत्रणा
अतिक्रमण निर्मूलन धडक कारवाई पथकामध्ये ७ कार्यकारी अभियंता, २२ कनिष्ठ अभियंता, २२ बीट निरीक्षक, १६८ महाराष्ट्र सुरक्षा दलाचे जवान, ४०० पोलिस आणि १२० मजूर सहभागी झाले होते. १५ पोकलेन, ३ जेसीबी यांचा वापर करण्यात आला. शिवाय २ अग्निशमन वाहने आणि ४ रुग्णवाहिका, कारवाईच्या चित्रीकरणासाठी १९ व्हिडीओग्राफर देखील आले होते. महापालिका यंत्रणेसह पोलिस, वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचार्यांनी कारवाईत भाग घेतला..
पिंपरी चिंचवड शहरात बांधकाम परवानगी घेऊनच बांधकामे करावीत. अनधिकृत व विना परवाना बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात येईल.
- शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका.
Related
Articles
पाकिस्तानातील भूकंपानंतर पळाले २०० हून अधिक कैदी
04 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
07 Jun 2025
कोकण, विदर्भात पाऊस; मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विश्रांती
01 Jun 2025
बालसाहित्य संवेदनशील पिढी घडवणारे असावे
01 Jun 2025
शिवसृष्टी पाहण्यासाठी शुक्रवारपासून ऑनलाईन नोंदणी
04 Jun 2025
’कोल्हापूर टस्कर’ संघ यावर्षी नक्कीच विजेतेपद मिळवेल : राहुल त्रिपाठी

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?