E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
शिवानी अग्रवालला जामीन
Samruddhi Dhayagude
29 Apr 2025
कल्याणीनगर अपघात प्रकरण
पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणात मोटारचालक आरोपी अल्पवयीन मुलाचा रक्ताचा नमुना बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या त्याची आई शिवानी अग्रवालला सर्वोच्च न्यायालयाने नुकताच अंतरिम जामीन मंजूर केला.
येरवडा येथील कल्याणीनगर भागात १८ मे २०२४ ला बांधकाम व्यावसायिक याच्या आरोपी अल्पवयीन मुलाने मद्याच्या नशेत भरधाव पोर्श मोटार चालवून संगणक अभियंता असलेल्या दोघांना धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणात येरवडा पोलिसांनी बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवालच्या आरोपी अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले. अपघातापूर्वी अल्पवयीन मुलगा आणि त्याच्या मित्राने मुंढव्यातील एका पबमध्ये मनसोक्त मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले होते.
मुलाला ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी वडिल विशाल अग्रवाल व त्याची पत्नी शिवानी अग्रवाल यांनी ससून रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हाळनोर यांच्याशी संगनमत करून मुलाचा रक्ताचा नमुना बदलण्यासाठी वैद्यकीय तज्ज्ञांना लाच दिले होते. याप्रकरणी शिवानी अग्रवालला १ जून २०२४ रोजी अटक झाली. तिने सर्वोच्च न्यायालयात अटकेच्या वैधतेला आव्हान दिले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने शिवानी अग्रवालला अंतरिम जामीन मंजूर केला. तसेच, तिच्या अर्जावरील निकाल राखून ठेवण्यात आला आहे. अंतरिम जामिनाच्या अटी आणि शर्ती निश्चित करण्यासाठी तिने शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज केला. वकील अंगदसिंग गिल आणि वकील ध्वनी शहा यांनी बाजू मांडली.
Related
Articles
व्हाइट हाऊसला सल्ला देतात दोन जिहादी!
19 May 2025
पुरंदरमधील सीताफळांची बाजारात आवक
22 May 2025
पाकिस्तानात शिवमंदिराच्या जमिनीवर बेकायदा कब्जा
24 May 2025
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलण्याची मागणी फेटाळली
21 May 2025
तुमचा ढोंगीपणा थांबवा; माफी मिळणार नाही!
19 May 2025
जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा
20 May 2025
व्हाइट हाऊसला सल्ला देतात दोन जिहादी!
19 May 2025
पुरंदरमधील सीताफळांची बाजारात आवक
22 May 2025
पाकिस्तानात शिवमंदिराच्या जमिनीवर बेकायदा कब्जा
24 May 2025
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलण्याची मागणी फेटाळली
21 May 2025
तुमचा ढोंगीपणा थांबवा; माफी मिळणार नाही!
19 May 2025
जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा
20 May 2025
व्हाइट हाऊसला सल्ला देतात दोन जिहादी!
19 May 2025
पुरंदरमधील सीताफळांची बाजारात आवक
22 May 2025
पाकिस्तानात शिवमंदिराच्या जमिनीवर बेकायदा कब्जा
24 May 2025
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलण्याची मागणी फेटाळली
21 May 2025
तुमचा ढोंगीपणा थांबवा; माफी मिळणार नाही!
19 May 2025
जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा
20 May 2025
व्हाइट हाऊसला सल्ला देतात दोन जिहादी!
19 May 2025
पुरंदरमधील सीताफळांची बाजारात आवक
22 May 2025
पाकिस्तानात शिवमंदिराच्या जमिनीवर बेकायदा कब्जा
24 May 2025
पहलगाम हल्ल्याच्या ठिकाणाचे नाव बदलण्याची मागणी फेटाळली
21 May 2025
तुमचा ढोंगीपणा थांबवा; माफी मिळणार नाही!
19 May 2025
जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगा
20 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाचे थैमान
2
अकरावीच्या केंद्रीय ऑनलाइन प्रवेशासाठी बुधवारपासून अर्ज
3
सोलापूरमधील कारखान्यात आगीचे तांडव
4
पीएसएलव्हीच्या प्रक्षेपणात अपयश
5
हैदराबादमधील आगीत ८ मुलांसह १७ जणांचा मृत्यू
6
मेक्सिकन नौदलाचे जहाज न्यूयॉर्कमध्ये पुलाला धडकले