E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
बावधन खुर्द व बावधन बुद्रुक गावठाणांची पाहणी सुरू
Wrutuja pandharpure
30 May 2025
दिलीप वेडेपाटील यांच्या प्रयत्नांना यश
पुणे
: बावधन खुर्द व बावधन बुद्रुक या गावांची गावठाण पाहणी गुरूवारपासून औपचारिकपणे सुरू झाली आहे. या महत्त्वपूर्ण प्रक्रियेसाठी गेल्या ५ वर्षांपासून सातत्यपूर्ण पाठपुरावा करणारे माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील यांचे प्रयत्न यशस्वी झाले आहेत.
बावधन परिसरातील झपाट्याने वाढणार्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर गावठाण हद्दीचे अचूक आणि कायदेशीर मोजमाप होणे ही अत्यावश्यक बाब होती. मात्र ही प्रक्रिया अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. याला चालना देण्यासाठी दिलीप वेडेपाटील यांनी शासन, महसूल विभाग, आणि जमाबंदी कार्यालयाशी सातत्याने संवाद साधून या विषयाला प्राधान्य देण्याची मागणी केली. या प्रक्रियेला गती मिळवून देण्यासाठी त्यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची विशेष भेट घेऊन बावधन गावातील स्थिती सविस्तरपणे मांडली. या बैठकीदरम्यान जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे, उपायुक्त राजेंद्र गोळे, तसेच जमाबंदी नगर भूमापन विभागाचे अधिकारी हे उपस्थित होते.
सर्व संबंधित अधिकार्यांच्या सहकार्याने कालपासून प्रत्यक्ष पाहणीचे काम सुरु झाले आहे. गावठाण हद्द, खाजगी जमिनी, रस्ते, सार्वजनिक जागा, मंदिरे, शाळा, यांचा नकाशा व मालकी हक्कांचे दस्तऐवजीकरण करण्यात येणार आहे. या पाहणीमुळे मालमत्तेवर कायदेशीर हक्क सिद्ध होणार, जमिनीच्या नोंदी शासकीय दस्तऐवजांमध्ये समाविष्ट होतील. बँक कर्ज, वारसा नोंदणी यांसारख्या प्रक्रियेस सुलभता. शासकीय योजना व नागरी सुविधांसाठी अडथळे दूर, बावधन गावाच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळणार आहे. दिलीप वेडेपाटील म्हणाले, पाहणी म्हणजे फक्त नकाशा काढण्याची प्रक्रिया नसून, हे गावाच्या विकासाच्या दृष्टीने एक मूलभूत पाऊल आहे. गावातील प्रत्येक नागरिकाचा कायदेशीर हक्क निश्चित व्हावा, हीच माझी भूमिका होती. ती पूर्ण होताना पाहून समाधान वाटते. या ऐतिहासिक निर्णयामुळे बावधन गावाच्या भविष्यकालीन पायाभरणीत महत्त्वाची भर पडणार असून, येत्या काळात अनेक विकासकामांना गती मिळणार आहे.
Related
Articles
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
पाच वाहनांचा विचित्र अपघात
20 Jun 2025
वाचक लिहितात
20 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
पाच वाहनांचा विचित्र अपघात
20 Jun 2025
वाचक लिहितात
20 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
पाच वाहनांचा विचित्र अपघात
20 Jun 2025
वाचक लिहितात
20 Jun 2025
बावुमा लंगडत धावताना संपूर्ण लॉर्ड्स भारावून बघत राहिले
15 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
चंद्रपूरमध्ये हत्तीच्या हल्ल्यात ज्येष्ठाचा मृत्यू
16 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
पाच वाहनांचा विचित्र अपघात
20 Jun 2025
वाचक लिहितात
20 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त