मदत साहित्याची वाहतूक करणार्‍या जहाजावर ड्रोन हल्ला   

गाझाजवळच्या समुद्रातील घटना 

तेल अवीव : गाझाजवळच्या माल्टा बंदराजवळील समुद्रात पॅलेस्टिनी नागरिकांना मदतीचे साहित्य घेऊन जाणार्‍या जहाजावर ड्रोन हल्ला करण्यात आला. शांतता आणि सामाजिक न्याय चळवळींअतर्गत जहाज गाझाकडे येत होते.
 
गाझा फ्रीडम फ्लोटिल्लाच्या वतीने नागरिकांसाठी अन्न, पाणी आणि अन्य जीवनावश्यक साहित्याची वाहतूक केली जात होती. माल्टा सरकारने सांगितले की, जहाजावर १२ खलाशी आणि चार नागरिक होते. ड्रोन हल्ल्यात प्राणहानी झाली नाही. दरम्यान, गेल्या दोन महिन्यांपासून इस्रायलने गाझाची रसद तोडली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांची अन्नपाण्याविना उपासमार होत आहे.  त्या पार्श्वभूमीवर मानवतेच्या दृष्टिकोनातून जहाज मदतीचे साहित्य घेऊन प्रवास करत होते. माल्टा बंदर परिसरात ते आले असताना त्याच्यावर ड्रोन हल्ला झाला होता. गेल्या १९ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. हमास ओलिसांना सोडत नाही अणि इस्रायल त्यांना सोडण्याची मागणी करत हल्ले करत आले आहे. त्यात सामान्य नागरिकांचा जीव जात आहे. रसद तोडल्यामुळे नागरिकांची उपासमार सुरू झाली आहे. या घडमोडीच्या पार्श्वभूमीवर मानवतावादी संघटना एकवटल्या असून त्यांनी रसद पोहोचविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यापूर्वी अनेकदा मदत साहित्याची वाहतूक करणार्‍या जहाजांवर हल्ले झाले आहेत. मदत साहित्यांचा पुरवठा करणार्‍यांमध्ये चार्ली अँडरसन यांचा पुढाकार आहे. ते म्हणाले, जहाजावर दोन स्फोट झाले.नंतर आग लागली. सर्व प्रवासी सुखरूप आहेत. 
 

Related Articles