E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पिंक ई-रिक्षाची मेट्रो, विमानतळाला पूरक सेवा
Wrutuja pandharpure
22 Apr 2025
अजित पवार यांची ग्वाही
पुणे
: पहिल्या टप्प्यात पिंक ई-रिक्षांना मिळणारा प्रतिसाद बघता राज्यातील इतरही शहरात पिंक ई-रिक्षा सुरु करण्यात येईल. मेट्रो स्थानके, विमानतळ व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षाला पुरक सेवेचा दर्जा देण्यात येईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
शिवाजीनगर येथील कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित पिंक ई-रिक्षा वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार बापुसाहेब पठारे, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, कायनेटिक ग्रीन कंपनीचे अध्यक्ष सुधांशू अग्रवाल, रितेश मंत्री उपस्थित होते.
पवार म्हणाले, महिला व बालविकास विभागाच्यावतीने पहिल्या टप्प्यात १० हजार पिंक ई-रिक्षा वाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामध्ये पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, अहिल्यानगर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर व सोलापूर या आठ शहराचा समावेश करण्यात आला आहे. पिंक ई-रिक्षा योजना महिलांना आर्थिक सक्षम आणि स्वावलंबी करणारी योजना आहे. या माध्यमातून महिलांकरीता रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यांचा आत्मविश्वास वाढविण्यासोबतच समाजातील स्थान बळकट करण्याचा हा सरकारचा प्रयत्न आहे. पिंक ई-रिक्षा योजनेकरीता २५ हजार रुपये केंद्रशासन आणि ७५ हजार रुपये राज्य सरकारच्यावतीने अनुदान स्वरुपात देण्यात येत आहे. विविध बँकेच्या माध्यमातून ७० टक्के कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
महिला वर्गाच्या सुरक्षिततेकरीता राज्य सरकार प्रयत्नशील आहे. पिंक ई-रिक्षा योजना समाजातील महिलांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने महत्वपूर्ण पाऊल आहे; चालक महिलांनी रिक्षा सुरक्षितरित्या चालविण्यासोबतच स्वत:बरोबर समाजातील इतर महिलांची देखील काळजी घ्यावी. पिंक ई-रिक्षा चालविणार्या महिला समाजातील इतर महिलांकरिता प्ररेणास्त्रोत ठरतील, अशा विश्वास व्यक्त पवार यांनी व्यक्त केला. मंत्री तटकरे म्हणाल्या, येत्या काळात पुणे येथे सुमारे एक हजारापेक्षा अधिक ई-वाहन चार्जिंग स्थानक करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पिंक ई-रिक्षा मेट्रो स्थानके, विमानतळ, औद्योगिक क्षेत्र व पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पिंक ई-रिक्षांची सेवा उपलब्ध करुन देण्यासोबतच ओला व उबेर कंपनी सोबत सामंजस्य करार करण्यात येत आहे.
उपसभापती गोर्हे म्हणाल्या, महिलाच्या अंगी असलेल्या कौशल्याचा वापर करुन त्या विविध क्षेत्रात काम करीत आहे. त्यांना विविध पुरस्कारही मिळत आहे, ही चांगली गोष्ट आहे. राज्य सरकारच्यावतीने महिलांच्या आर्थिक सबलीकरणाकरीता विविध प्रगतिशील योजना सुरु करण्यात आल्या आहेत. महिलांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करुन त्यांचा आत्मविश्वास वाढविणारी पिंक ई-रिक्षा योजना असून महिलांची सुरक्षितता जतन करण्याचे काम या योजनेच्या माध्यमातून होणार आहे.यावेळी महिला व बालविकास विभाग, महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचार्यांसोबतच लाभार्थी महिला उपस्थित होत्या.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
17 May 2025
साथरोगात जीवशास्त्र विभागाची भूमिका महत्त्वाची
14 May 2025
सिंधूचे पाणी देण्याची पाकिस्तानची याचना
15 May 2025
माणूसकी हाच खरा शाश्वत धर्म
19 May 2025
मार्केटयार्डातील व्यापार्याला पाकिस्तानातून धमकी
16 May 2025
आयसर गेटसमोरील रस्त्यावर पाणी; नागरिक हैराण
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 May 2025
साथरोगात जीवशास्त्र विभागाची भूमिका महत्त्वाची
14 May 2025
सिंधूचे पाणी देण्याची पाकिस्तानची याचना
15 May 2025
माणूसकी हाच खरा शाश्वत धर्म
19 May 2025
मार्केटयार्डातील व्यापार्याला पाकिस्तानातून धमकी
16 May 2025
आयसर गेटसमोरील रस्त्यावर पाणी; नागरिक हैराण
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 May 2025
साथरोगात जीवशास्त्र विभागाची भूमिका महत्त्वाची
14 May 2025
सिंधूचे पाणी देण्याची पाकिस्तानची याचना
15 May 2025
माणूसकी हाच खरा शाश्वत धर्म
19 May 2025
मार्केटयार्डातील व्यापार्याला पाकिस्तानातून धमकी
16 May 2025
आयसर गेटसमोरील रस्त्यावर पाणी; नागरिक हैराण
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 May 2025
साथरोगात जीवशास्त्र विभागाची भूमिका महत्त्वाची
14 May 2025
सिंधूचे पाणी देण्याची पाकिस्तानची याचना
15 May 2025
माणूसकी हाच खरा शाश्वत धर्म
19 May 2025
मार्केटयार्डातील व्यापार्याला पाकिस्तानातून धमकी
16 May 2025
आयसर गेटसमोरील रस्त्यावर पाणी; नागरिक हैराण
15 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
पहलगामनंतरचे बहुतांश सायबर हल्ले निष्फळ
2
पहलगाम हल्ल्यातील सूत्रधारासह तीन दहशतवादी ठार
3
अरुणाचल प्रदेश भारताचाच
4
दहशतवादी मसूद अझहरला १४ कोटी रुपयांची भरपाई?
5
गवई घटनात्मक मूल्ये राखण्यास सक्षम
6
हकालपट्टीच हवी