मुंबई : प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींवरील बंदी उठवण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे गणेश मंडळांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने पोओपी मूर्ती बनवणे आणि विक्री करण्यावरील बंदी उठवली आहे. पण, मूर्तींचे विसर्जन हे नैसर्गिक जलस्रोतांऐवजी कृत्रिम तलावांमध्येच करण्याची अट कायम राहणार आहे. या निर्णयावर न्यायालयात दोन्ही बाजूंनी सहमती दर्शवली आहे. दरम्यान, न्यायालयाने राज्य सरकारला तीन आठवड्यांच्या आत एक समिती नेमून पीओपी मूर्तींच्या विसर्जनासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, त्याविषयी सविस्तर आणि सखोल माहिती न्यायालयासमोर सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Fans
Followers