E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मंडई मेट्रो स्थानकाचे तिसरे प्रवेशद्वार आजपासून खुले
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
पुणे : मंडई मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार क्रमांक तीन हे आजपासून प्रवाशांसाठी खुले करण्यात आले आहे. तसेच, रामवाडी आणि कासारवाडी मेट्रो स्थानकांवरील प्रवेशद्वारांवर सरकते जिने (एस्केलेटर) सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे. मंडई मेट्रो स्थानक हे शहराच्या मध्यवस्तीतील स्थानक असून अनेक मध्यवर्ती स्थळापासून अत्यंत जवळ आहे. मंडई मेट्रो स्थानकाचे नव्याने सुरू झालेले प्रवेशद्वार क्रमांक ३ महात्मा फुले मंडई येथील टिळक पुतळ्याजवळ आहे.
या प्रवेशद्वारामुळे प्रवाशांना बाबुगेनू गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती, तुळशीबाग, शनिपार या धार्मिक आणि पर्यटन स्थळांना भेट देणार्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. दुसरीकडे, रामवाडी आणि कासारवाडी मेट्रो स्थानकांवर सरकत्या जिन्यांची सोय करण्यात आली असून, आजपासून रामवाडी मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक २ आणि कासारवाडी मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक ३ येथे आता सरकते जिने सुरू करण्यात आले आहेत.
या प्रवेशद्वारांतून स्थानकात ये-जा करण्यासाठी यापूर्वीच जिना आणि लिफ्टची सुविधा उपलब्ध होती, परंतु, आता सरकत्या जिन्यांमुळे प्रवाशांना विशेषतः ज्येष्ठ नागरिक, लहान मुले आणि अधिक साहित्य असलेल्या व्यक्तींना अधिक सोयीचे होणार आहे. या नवीन सुविधांमुळे पुणे मेट्रोच्या सेवेचा लाभ घेणार्या प्रवाशांच्या संख्येत वाढ होईल, असा विश्वास मेट्रो प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
Related
Articles
चाकणजवळील वाकी गावात दरोडा
16 Jun 2025
चार हजार कोटींच्या ठेवी असताना पालिका मोशी रुग्णालयासाठी घेणार ५५० कोटींचे कर्ज
11 Jun 2025
वारकर्यांसाठी १२ ठिकाणी ‘जर्मन हँगर’
12 Jun 2025
शेतजमिनीची प्रकरणे मार्गी लावण्याकरीता लोकअदालतीचे आयोजन करा : महसूलमंत्री
11 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
हिंजवडीत साचलेल्या पाण्यामुळे अधिकारी धारेवर

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक