E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
कपडे आणि बुटांवरील खर्चात मोठी घट
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
वृत्तवेध
भारतीय घरांमध्ये कपडे आणि बुटांवरील खर्च तीन वर्षांमधील सर्वात कमी पातळीवर आला आहे. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २०२३-२४ मध्ये हा खर्चही कोरोनाच्या आधीच्या तुलनेत कमी होता. या खर्चात घट होण्याचे हे सलग दुसरे वर्ष होते. २०२२-२३ च्या सुरुवातीला त्यात १.४ टक्क्यांनी घट झाली होती. त्यानंतर, सलग दुसर्या वर्षी घट झाली.
अर्थतज्ज्ञांच्या मते वाढती महागाई आणि पगारात वाढ न झाल्यामुळे ग्राहकांनी अनावश्यक खर्च कमी केला. त्यामुळे ही कपात झाली. २०२३-२४ मध्ये कपडे आणि बुटांवर ४.५३ लाख कोटी रुपये खर्च झाले. ते २०२२-२३ मधील ४.८७ लाख कोटी रुपयांपेक्षा सुमारे सात टक्के कमी होते. २०१९-२० मध्ये ४.५३ लाख कोटी रुपयांचे कपडे आणि बूट विकले गेले होते. कोविड महामारीमुळे आर्थिक व्यवहारांमध्ये काटछाट झाल्यामुळे २०२०-२१ मध्ये कपडे आणि बुटांवरील खर्च १५ टक्क्यांनी कमी झाला.
कपडे आणि शूज महागले
‘इंडिया रेटिंग्ज’चे असोसिएट डायरेक्टर पारस जसराय म्हणाले की २०२२-२३ मध्ये कपडे आणि बुटांमध्ये सुमारे ९ टक्के महागाई दिसून आली आणि पुढील आर्थिक वर्षात त्यामध्ये ७.२ टक्के महागाई दिसून आली. लोकांनी जीवनशैलीशी संबंधित खर्चाऐवजी अन्न आणि आरोग्य यासारख्या आवश्यक खर्चांना प्राधान्य दिले. बूट खरेदीवरील खर्च २०२२-२३ मधील १.०१ लाख कोटी रुपयांवरून २०२२-२४ मध्ये सुमारे दोन टक्क्यांनी कमी होऊन ९९,५०० कोटी रुपयांवर आला. या काळात कपड्यांवरील खर्चात ८.५ टक्क्यांची मोठी घट झाली. २०२२-२३ मध्ये ३.८६ लाख कोटी रुपयांवरून कपड्यांवरील खर्च पुढील आर्थिक वर्षात ३.५३ लाख कोटी रुपयांवर आला. ‘बँक ऑफ बडोदा’चे मुख्य अर्थशास्त्रज्ञ मदन सबनवीस म्हणतात की या काळात उच्च महागाईसह ग्रामीण मागणी कमी राहिली. कोरोना महामारीमुळे टाळेबंदीचा कमाईवर मोठा परिणाम झाला.
Related
Articles
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे
13 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
विमान सुरक्षेचाच कोळसा...
13 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे
13 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
विमान सुरक्षेचाच कोळसा...
13 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे
13 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
विमान सुरक्षेचाच कोळसा...
13 Jun 2025
तेहरानवर मोठा हवाई हल्ला होणार
17 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
अन्नाचे औषध म्हणून सेवन करा : डॉ. श्रीराम नायकरे
13 Jun 2025
प्रभाग रचनेच्या आदेशात वेळेची स्पष्टता नाही; मार्गदर्शन घेणार
12 Jun 2025
विमान सुरक्षेचाच कोळसा...
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !