मंडई मेट्रो स्थानक परिसरात हत्या   

पुणे : मंडई मेट्रो स्थानक परिसरात असलेल्या एका बियर शॉपी समोर बुधवारी (४ जून) सकाळी साडेपाचच्या सुमारास एकाचा खून केल्याची घटना समोर आली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी एका फिरस्त्याला ताब्यात घेतले आहे. खून झालेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. रमेश प्रकाश सत्रे (वय-२२, बाजीराव रस्ता, मूळ रा. कात्रड वांभुरी, ता. राहुरी, अहिल्यानगर) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सहायक पोलीस निरीक्षक पांडुरंग माणिक वाघमारे यांनी याप्रकऱणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली.

Related Articles