मंत्री विजय शहा यांच्या अटकेवरील स्थगितीला मुदतवाढ   

नवी दिल्ली : ’ऑपरेशन सिंदूर’ बद्दल माध्यमांना माहिती देणार्‍या कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविरुद्धच्या वादग्रस्त टिप्पणी प्रकरणी मध्य प्रदेशाचे मंत्री विजय शाह यांना बुधवारी दिलासा मिळाला. त्यांच्या अटकेला स्थगिती देण्याच्या हंगामी आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ दिली आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरु असल्याने मध्य प्रदेश उच्च न्यायालयात प्रलंबित कार्यवाही देखील बंद करावी, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.कालच्या सुनावणीत मध्य प्रदेश पोलीस महासंचालकांनी सादर केलेल्या स्थिती अहवालाची सर्वोच्च न्यायालयाने नोंद घेतली. या प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन आयपीएस अधिकार्‍यांची एसआयटी स्थापन करण्यात आली असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. 

Related Articles