E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
सूर्यकुमार यादवचा जागतिक विक्रम
Samruddhi Dhayagude
27 May 2025
मुंबईचे पंजाबला १८५ धावांचे आव्हान
जयपूर : मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये या हंगामातील सर्वात महत्वाचा सामना खेळला जात आहे. मुंबईने पंजाबसमोर १८५ धावांचे आव्हान ठेवले आहे.
मुंबई इंडियन्सचा स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव यंदाच्या मोसमात वादळी फॉर्मात आहे. प्रत्येक सामन्यागणिक सूर्यकुमार यादवचा फॉर्म कायम राहिला आहे. आयपीएल २०२५ मध्ये खराब सुरुवातीनंतर दमदार पुनरागमन करणार्या आणि प्लेऑफमध्ये पोहोचवण्यासाठी सूर्यकुमार यादवच्या दमदार फलंदाजीने मोठी भूमिका बजावली. लीगच्या शेवटच्या सामन्यातही हीच कामगिरी कायम ठेवून सूर्यकुमार यादवने विश्वविक्रम केला आहे.
सूर्यकुमार यादवने मुंबई इंडियन्सच्या गेल्या सामन्यात वादळी खेळी करत विश्वविक्रमाची बरोबरी केली होती. आता सूर्यकुमार यादवने पंजाब किंग्स विरूंद्ध सामन्यात सातत्यपूर्ण फलंदाजी करत वर्ल्ड रेकॉर्ड केला. सूर्यकुमार यादवने पंजाब किंग्सविरूद्ध सामन्यातही शेवटपर्यंत मैदानावर राहत अर्धशतकी खेळी करत संघाला महत्त्वपूर्ण धावा करून दिल्या.
सूर्यकुमार यादवने या सामन्यात ३९ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. मुंबईकडून या सामन्यात अर्धशतकी खेळी करणारा सूर्या एकमेव खेळाडू होता. सूर्यकुमार यादवने या कामगिरीसह टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील अनोख्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
सहाव्या षटकात पहिली विकेट गमावल्यानंतर सूर्या मैदानावर आला आणि त्याने येताच चौकार मारून धावा काढण्यास सुरुवात केली. यादरम्यान, सूर्याने ९व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारला, ज्यामुळे त्याची धावसंख्या २२ धावांवरून २६ धावांवर पोहोचली. सूर्याने या एका चौकाराने इतिहास रचला. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने सलग १४व्या डावात २५ धावांचा टप्पा ओलांडला. यासह, त्याने दक्षिण आफ्रिकेचा माजी टी-२० कर्णधार टेम्बा बावुमाला मागे टाकत एक नवा विश्वविक्रम रचला.
इतकेच नव्हे तर आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एका फलंदाजाने लीग स्टेजच्या प्रत्येक सामन्यात २५ पेक्षा जास्त धावा केल्या. मुंबईच्या फलंदाजाने या हंगामात सर्व लीग स्टेज सामन्यांमध्ये २५+ धावांच्या खेळी खेळल्या आहेत. त्याच्या आधी, २०१८ मध्ये, केन विल्यमसनने आयपीएलमध्ये सलग १३ डावांमध्ये २५+ धावा केल्या होत्या. तर, शुबमनने २०२३ मध्ये सलग १३ डावांमध्ये २५+ धावांच्या खेळीही खेळल्या.
Related
Articles
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा
11 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
दोघांची प्रकृती चिंताजनक
11 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा
11 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
दोघांची प्रकृती चिंताजनक
11 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा
11 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
दोघांची प्रकृती चिंताजनक
11 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
भारताचा ऑस्ट्रेलियाकडून पराभव
16 Jun 2025
प्रदेशाध्यक्ष पदाच्या जबाबदारीतून मुक्त करा
11 Jun 2025
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
वाचक लिहितात
12 Jun 2025
दोघांची प्रकृती चिंताजनक
11 Jun 2025
वासोटा किल्ला आजपासून पर्यटनासाठी बंद
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक