शाळेच्या वर्गखोल्या निर्मितीत गैरव्यवहार   

सिसोदिया, सत्येंद्र जैन यांच्यावर गुन्हा

नवी दिल्ली : आपचे नेते आणि माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्या विरोधात भ्रष्टाचार विरोधी विभागाने बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे सरकार सत्तेवर होते. तेव्हा सरकारी शाळेतील १२ हजार ७४८ वर्ग निर्मिती प्रकरणात दोघांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवला आहे. भ्रष्टाचार सुमारे दोन हजार कोटी रुपयांचा आहे. वर्ग निर्मितीसाठी चढ्या दराने कंत्राट दिले. त्यासाठी प्रत्येक वर्गासाठी २४ लाख ८६ हजार रुपये खर्च ठरविला होता. तो सरासरी किंमतीच्या पाचपट असल्याचे भ्रष्टाचार विरोधी विभागाने म्हटले आहे. प्रक़ल्प साकारताना आपचे सरकार सत्तेवर होते. तेव्हा आपच्या कंत्राटदारांनाच वर्ग निर्मितीचे कंत्राट दिल्याचे उघड झाले होते. तेव्हा सिसोदिया शिक्षण मंत्री आणि जैन सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. शाळांच्या इमारती आणि वर्गखोल्यांच्या निर्मितीत प्रचंड आर्थिक अनियमितता असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.  

Related Articles