भारत आणि पाकिस्तान माझे जवळचे डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका दुटप्पी   

वॉशिंग्टन : पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचे आध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दुटप्पी भूमिका घेतली आहे. हल्ल्यानंतर ट्रम्प आणि त्यांच्या सरकारने दिलेल्या विधानांमध्ये अजिबात सुसंगतता नाही. एकीकडे अमेरिका या मुद्द्यावर पूर्णपणे भारतासोबत उभे राहण्याबद्दल बोलत आहे. परंतु ट्रम्प यांचे पाकिस्तानवरील प्रेमही उफाळून आले आहे. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, दोन्ही देशांमधील हा तणाव खूप जुना आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शेहबाज शरीफ आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी लवकरच तणाव कमी करतील, अशी आशा आहे. दोन्ही देश माझे जवळचे आहेत. त्यांचे विधान अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गॅबार्ड यांनी पहलगाम ह्ल्लानंतर केलेल्या विधानपेक्षा वेगळे आहे. 
 
हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह अमेरिकन सरकारकडून तीन विधाने आली आहेत. त्यात खूपच फरक आहे. पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर अमेरिका आणि ब्रिटनचे भांडे फोडले. अमेरिका आणि ब्रिटनसह संपूर्ण पश्चिमेसाठी  दहशतवाद पोसण्याचे घाणेरडे काम’ केले, त्याचे परिणाम आता पाकिस्तान भोगत आहे, असे त्यांनी मुलाखतीत सांगितले होते. यानंतर ट्रम्प यांनी ’मोदी माझे सर्वात चांगले मित्र आहेत’ हा मुखवटा काढून टाकला आहे .

सरकारची अधिकृत भूमिका काय आहे?

अमेरिकेने ९|११ च्या दशतवादी हल्ल्यानंतर गुप्तपणे पाकिस्तानात घुसून हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेनला मारले होते. पण, ज्या दिवशी ट्रम्प यांनी पाकिस्तान आणि भारताला एकाच तराजूत तोलण्याचे धाडस केले, त्याच दिवशी त्यांच्या सरकारच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड यांनी अमेरिका भारतासोबत आहे आणि दोषींवर कारवाईसाठी शमर्थन करते, असे सांगितले.. इस्लामिक दहशतवादी हल्ला होता, असे सांगताना आम्ही भारतासोबत एकजुटीने उभे आहोत, असेही सांगितले होते.

ट्रम्प भूमिका बदलली का ?

पहलगामनंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन केला.  तुलसी गॅबार्ड यांनी जे सांगितले तेच पुन्हा सांगितले. दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी भारताला पूर्ण पाठिंबा देण्याचे आाश्वासन दिले. या कारणास्तव, गॅबार्डच्या विधानाचा अर्थ असा लावण्यात आला की भारताने पाकिस्तानात घुसून दोषीना शिक्षा देण्याची कारवाई केली तरी अमेरिकेला कोणतीही अडचण नाही. परंतु, ट्रम्प यांच्या नवीन विधानावरून असे दिसून येते की त्यांचे हेतू स्पष्ट नाहीत.

तोंडात ’राम’ आणि काखेत ’चाकू’

जेव्हा अमेरिकेत ९/११ घडले तेव्हा दहशतवादाविषयीचा त्यांचा दृष्टिकोन बदलला. त्याने पाकिस्तानात प्रवेश केला आणि बदला घेतला. आता जेव्हा त्यांना भारतातील दहशतवादाविरुद्ध उघडपणे उभे राहण्याची संधी मिळाली आहे, तेव्हा ट्रम्प यांच्या तोंडात ’राम’ आणि बगलेत ’चाकू’ आहे. ’मोदी माझे सर्वात चांगले मित्र आहेत’, असे सांगणारे हेच ते ट्रम्प आहेत. पण, ट्रम्प यांची भूमिका हल्ल्यानंतर आणि भारताकडून होणार्‍या कारवाईबाबत संभ्रम निर्माण करणारी आहे. या उलट दहशतवादाविरुद्धच्या लढाईत भारताचा सर्वात खरा मित्र इस्रायल ठरला आहे. जो या मुद्द्यावर कधीही गोंधळलेला नाही आणि कोणत्याही संकोचाशिवाय भारतासोबत उभा राहिला आहे.
 

Related Articles