दिल्लीच्या गोलंदाजांची शानदार कामगिरी   

नवी दिल्ली : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात गत विजेता कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात झालेल्या आयपीएलच्या सामन्यात कोलकात्याच्या संघाने २० षटकांत २०४ धावा केल्या. यावेळी दिल्लीच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली.दिल्लीच्या गोलंदाजांपैकी अक्सर पटेल याने २ फलंदाज तर विपराज निगम याने २ फलंदाज बाद केले. मिचेल स्टार्क आणि दुशमंथा चामरा यांनी प्रत्येकी १ फलंदाज बाद केला. कोलकात्याच्या फलंदाजांपैकी सलामीवीर गुरबाझ याने २६ धावा केल्या. तर सुनिल नार्णे याने २७ धावा केल्या. अजिंक्य रहाणे २६ धावांवर बाद झाला. त्याला अक्सर पटेल याने पायचित बाद केले. 
 
अग्ंरिश रघुवंशी याने ४४ धावा केल्या. त्याचे अर्धशतक थोडक्यात हुकले.  व्यंकटेश अय्यर ७ धावांवर तर रिंकू सिंग ३६ धावांवर बाद झाला. रसेल याने १७ तर रोमन पॉवेल याने ५ धावा केल्या. 

Related Articles