झोपडपट्टीधारकांना प्रशासनाकडून मदत नाही   

काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक 

खराडी : चंदननगर परिसरातील झोपडपट्टीला आग लागून स्थानिक नागरिक रस्त्यावर आले. मात्र, गेल्या पाच दिवसापासून महापालिका आणि राज्यशासनाने अजून नागरिकांना कोणतीही मदत पोहचविली नसल्याने वडगावशेरी मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले आहे. शासन आणि प्रशासनाने अन्नधान्य आणि निवारा तत्काळ उपलब्ध करण्याची मागणी पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकार्‍याकडे केली आहे. 
 
चंदननगर मधील सुंदरबाई मराठे शाळेजवळील डॉ.बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टीला २३ एप्रिला पहाटे आग लागली. यामध्ये ९५ झोपड्या भस्मसात झाल्या. यामुळे नागरिकांचे अन्नधान्य आणि कपडे जळून खाक झाले आता त्यांच्याकडे काही नाही. त्यांची परिस्थिती फारच बिकट झाली आहे. 
 
यासाठी शासनाने त्वरित कपडे, जेवण व भांडी द्यावीत जळालेली घरे शासनाने आहे. त्याच जागेवर बांधून द्यावी. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांना वडगावशेरी मतदारसंघ काँग्रेस पक्षाच्या पदाधिकार्‍यांनी दिले. तत्काळ सुविधा उपलब्ध न केल्या सर्वत्र आंदोलन करणार असल्याचा इशारा येरवडा ब्लॉक अध्यक्ष रमेश सकट यांनी दिला.
 
यावेळी माजी नगरसेवक राजेंद्र शिरसाठ, मिडीया सेलचे अमित कांबळे, प्रभाग अध्यक्ष डॉ.रमाकांत साठे, सखाराम रणपिसे, विनोद तोरणे, कैलास गलांडे, जॉन्सन हिरे, तारा शर्मा, संगीता क्षीरसागर, दिनेश कांबळे, जयश्री कांबळे, मिरा सदाकळे, गोरक्षनाथ अडागळे, गणेश मिसाळ आदी उपस्थित होते.

Related Articles