कलश रथयात्रा मंगळवारी पुण्यात   

पुणे : महापुरूषांच्या पावनभूमीतील माती व नद्यांचे पाणी एकत्र करून कलश तयार केला आहे. या कलशचे दर्शन लोकांना उपलब्ध करण्यात आले आहे. यासाठी कोल्हापूरहून कलश रथयात्रा काढण्यात आली आहे. या कलशचे पुणेकरांना दर्शन  व्हावे म्हणून २९ एप्रिल रोजी राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने जिल्ह्यासह शहरात कलश पूजन रथयात्रेचे स्वागत करणार आहे. 
 
२९ ते ३० एप्रिल पर्यत पुणेकरांसाठी गुप्ते मंगल कार्यालय नारायण पेठ येथे दर्शनासाठी कलश ठेवण्यात येणार असल्याची माहिती पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांनी दिली.मुंबईत यंदाच्या ६५ व्या महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे ते ४ मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन राष्ट्रवादी पक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. यासाठी मुंबई येथे कलशचे महापूजन करण्यात येणार आहे. २९ तारखेला सायंकाळी पुणे शहरात येणार्‍या या रथयात्रेचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख नेते, शहर व विधानसभा तसेच महिला, युवक, युवती, विद्यार्थी सेलसह सर्व पदाधिकारी यांनी नियोजन केले आहे.  
 
सासवडहून कलश रथयात्रा हडपसर मार्गी साने गुरुजी भवन येथून शहरात येणार आहे.  प्रथम क्रांतीसुर्य महात्मा ज्योतीबा फुले व सावित्री माई फुले यांच्या वाड्यात त्यांना अभिवादन करून नंतर राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन लालमहाल येथे आगमन होईल. तसेच शनिवारवाडा येथून केसरीवाड्यापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक भागातील महापुरुषांच्या वास्तव्याने समृद्ध झालेल्या, त्यांच्या महान कार्यांनी प्रेरित अशा प्रदेशांतील माती विशेष नद्या आणि संगमस्थळांहून आणलेले पाणी या मंगल कलशांमध्ये एकत्रित करण्यात येणार असून महाराष्ट्र दिनानिमित्त मुंबई येथे आणले जाणार आहे.
 
यावेळी शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश घुले, महेश शिंदे, रुपाली पाटील-ठोंबरे, दत्ता सागरे,  बाबुराव चांदेरे, प्रमोद निम्हण,  बाबासाहेब पाटील, राकेश कामठे, शंतनू जगदाळे,  अजय दराडे, अभिषेक बोके, राजेंद्र पवार,  मोहन मोरे, मारुती अवरगंड, युवक अंगद माने, विजय आंधळे, अब्दुल शेख, स्नेहल कांबळे, रिना अडागळे, स्वाती आवळे, सुप्रिया साठे, आशा दीक्षित उपस्थित  होते.

Related Articles