E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
जगभरातून हल्ल्याचा निषेध
Samruddhi Dhayagude
24 Apr 2025
ट्रम्प, पुतीन, नेतन्याहू यांच्याकडून दु:ख व्यक्त
वॉशिंग्टन / मॉस्को : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याचा निषेध जगभरातील राष्ट्रप्रमुखांनी बुधवारी केला. त्यात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन, इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू आणि अन्य जणांचा समावेश होता.
धर्म आणि नाव विचारून दहशतवाद्यांनी २६ हिदू पर्यटकांना वेचून ठार केले. या घटनेचा जगभर निषेध केला जात आहे. ट्रम्प, पुतीन, नेतन्याहू आणि अन्य नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करुन आम्ही तुमच्या सोबत असून हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा करत असल्याचे म्हटले आहे. दोषीवर कठोर कारवाईसाठी अमेरिका भारतासोबत असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. निष्पाप नागरिकांच्या मृत्यूबद्दल दु:ख व्यक्त करुन त्यांच्याबद्दल सहानुभूती त्यांनी व्यक्त केली. दहशतवादाविरोधात भारत आणि अमेरिका एकत्रित कार्य करणार असल्याचेही ते म्हणाले. तत्पूर्वी त्यांनी एक्सवर पोस्ट टाकली होती. त्यात म्हटले की, काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याने मी व्यथित झालो. दहशतवादाविरोधात लढण्या-साठी भारताच्या पाठीशी अमेरिका दृढपणे उभी राहणार आहे.
रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंंद्र मोदी यांना संपूर्ण पाठिंबा व्यक्त केला. अत्यंत क्रूर गुन्हा दहशतवाद्यांनी केला आहे. त्यांना कठोरात कठोर शिक्षा व्हायला हवी. मृतांच्या आत्म्याला शांती लाभो, अशी प्रार्थना त्यांनी केली. तसेच जगभरातील दहशतवादी हल्ल्यांत निष्पाप जीव जात असल्याबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. सर्व प्रकारचा दहशतवाद संपुष्टात आणण्यासाठी रशिया भारताला सहकायर्र् करणार आहे. जखमी लवकर बरे व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी एक्सवर पोस्ट टाकून हल्ल्याचा निषेध केला. अत्यंत क्रूर हल्ला असे त्याचे वर्णन केले. मृत कुटुंबांच्या दु:खात इस्रायल सामील आहे. दहशतवादाविरोधात लढा देण्यासाठी इस्रायलचा पाठिंबा भारताला कायम असेल, असेही ते म्हणाले.
इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी दु:खद घटना असे हल्ल्याचे वर्णन केले. मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकांबद्दल आणि जखमींबद्दल सहानुभूती व्यक्त केली. सरकार आणि भारतवासीयांच्या मागे इटली उभी असल्याचे त्या म्हणाल्या.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स यांच्या भारत दौर्यावेळी दहशतवादी हल्ला झाला आहे. त्यामुळे त्यांनी देखील तीव्र शब्दांत निषेध केला. त्यांच्या पत्नी उषा म्हणाल्या, भारताचे सौंदर्य आणि संस्कृती पाहण्यासाठी आम्ही सहकुटुंब आलो. ते पाहून आम्ही भारावून गेलो. पण, दहशतवादी हल्ल्याने आमच्या आनंदावर काहीसे विरजण पडले. मृतांच्या नातेवाईकांच्या दु::खात आम्ही सामील आहोत.अन्य देशांनी देखील तीव्र शब्दांत हल्ल्याची निंदा केली आहे. त्यामध्ये ब्रिटन, जर्मनी, संयुक्त अरब अमिरात, श्रीलंका अन्य देशांच्या परराष्ट्र खात्यांचा समावेश होता.
पाकिस्तानचा ढोंगीपणा उघड
इस्लामाबाद : पहलगामधील दहशतवादी हल्ला पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या इशार्यावरून घडवून आणला असताना पाकिस्तान सरकारने मात्र, हल्ल्याचा निषेध करुन दुटप्पी भूमिका घेतली आहे. कांगावा आणि खोटेपणाचा कळस या माध्यमातून गाठला आहे.
दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाल्याबद्दल पाकिस्तानने दु:ख व्यक्त केले. मृतांच्या नातेवाईकांच्या दु:खात सहभागी असून जखमी लवकर बरे व्हावेत, असे म्हटले आहे. दहशतवादी हल्ल्याबाबत माध्यमांनी परदेश कार्यालयाच्या प्रवक्त्याला प्रश्न विचारला होता. दरम्यान, बंदी घातलेल्या लष्कर ए तैयबा दहशतवादी संघटनेशी सबंधित द रसिस्टन्स फोर्सने (टीआरएफ) दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती. लष्कर ए तैयबा पाकिस्तान पुरस्कृत आहे. मूळही तिथलेच असताना पाकिस्तानने हल्ल्याचा निषेध करत नक्राश्रू ढाळल्याचे स्पष्ट होत आहे.अधिकारी म्हणाले. दहशतवादी गट किश्तवाडमार्गे जम्मूत घुसला असावा. तेथून तो पहलगाम येथील बसीरन येथे दक्षिण काश्मीरमधील कोकेनाग मार्गे पोहोचला असावा.
मुनीर यांच्या विधानानंतर हल्ला
काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख असिम मुनीर यांनी काश्मीर पाकिस्तानची नस असल्याचे तसेच भारत आणि पाकिस्तान असा द्विराष्ट्र सिद्धांत मांडताना हिंदू पेक्षा आपण (पाकिस्तानी) वेगळे असल्याचे विधान केले होते. यानंतर पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केवळ हिंदू पर्यटकांना लक्ष्य केले आहे हा एक योगायोग नसावा, असा कयास व्यक्त केला जात आहे. मुनीर यांचे वक्तव्य आणि हिंदू पर्यटकांना वेचून ठार मारण्याचा प्रकार नियोजनबद्ध कारस्थानाचा एक भाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
Related
Articles
महिला लष्करी अधिकार्यांची शौर्यगाथा!
12 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
दिल्ली कॅपिटल्स संघातून मुस्तफिजूर रहमानला संधी
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
पुणे विभागाचा ९४.८१ टक्के निकाल; विभागात पुणे जिल्हा अव्वल
14 May 2025
मार्केटयार्ड प्रवेशद्वारासमोर ’नो पार्किंग झोन’
18 May 2025
महिला लष्करी अधिकार्यांची शौर्यगाथा!
12 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
दिल्ली कॅपिटल्स संघातून मुस्तफिजूर रहमानला संधी
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
पुणे विभागाचा ९४.८१ टक्के निकाल; विभागात पुणे जिल्हा अव्वल
14 May 2025
मार्केटयार्ड प्रवेशद्वारासमोर ’नो पार्किंग झोन’
18 May 2025
महिला लष्करी अधिकार्यांची शौर्यगाथा!
12 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
दिल्ली कॅपिटल्स संघातून मुस्तफिजूर रहमानला संधी
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
पुणे विभागाचा ९४.८१ टक्के निकाल; विभागात पुणे जिल्हा अव्वल
14 May 2025
मार्केटयार्ड प्रवेशद्वारासमोर ’नो पार्किंग झोन’
18 May 2025
महिला लष्करी अधिकार्यांची शौर्यगाथा!
12 May 2025
रुग्णाचा मृतदेह अडवून ठेवू नका
13 May 2025
दिल्ली कॅपिटल्स संघातून मुस्तफिजूर रहमानला संधी
15 May 2025
व्हॉट्सऍप कट्टा
15 May 2025
पुणे विभागाचा ९४.८१ टक्के निकाल; विभागात पुणे जिल्हा अव्वल
14 May 2025
मार्केटयार्ड प्रवेशद्वारासमोर ’नो पार्किंग झोन’
18 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
संघर्ष ‘सध्या’ थांबला (अग्रलेख)
2
राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण
3
मानकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
4
ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरूच
5
बाळासाहेब नाहाटा यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा
6
१०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा; ४० पाकिस्तानी सैनिकही ठार