E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
९९ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ रविवारी ठरणार
Samruddhi Dhayagude
06 Jun 2025
पुणे
: राजधानीत साहित्य संमेलन पार पडल्यानंतर आता ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे वेध लागले आहेत. आगामी साहित्य संमेलनासाठी साहित्य महामंडळाच्या संमेलन स्थळ निवड समितीकडून आज (शुक्रवार) उद्या (शनिवारी) औदुंबर, इचलकरंजी, कोल्हापूर आणि सातारा येथील स्थळांची पाहणी केली जाणार आहे. त्यानंतर येत्या रविवारी संमेलन स्थळ निश्चित केले जाणार आहे.
९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी साहित्य महामंडळाकडून स्थळ निवड समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती पाच, सहा आणि सात जून रोजी निमंत्रक संस्थांना भेट देणार आहे. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी, सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत. अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
आगामी संमेलनासाठी आलेल्या निमंत्रण स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक रविवारी सकाळी पुण्यात होणार आहे. त्यानंतर त्याच दिवशी सकाळी ११ वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक होणार आहे. त्यात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळावरती शिक्कामोर्तब होईल. स्थळ निवड समितीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, मराठवाडा साहित्य परिषदेचे रामचंद्र काळुंखे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे.
Related
Articles
जनार्दन रेड्डी यांची शिक्षा स्थगित
12 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
जनार्दन रेड्डी यांची शिक्षा स्थगित
12 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
जनार्दन रेड्डी यांची शिक्षा स्थगित
12 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
जनार्दन रेड्डी यांची शिक्षा स्थगित
12 Jun 2025
उच्चस्तरीय समितीतर्फे विमान अपघाताची चौकशी
15 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
ज्योती मल्होत्राला जामीन नाकारला
12 Jun 2025
डिंभे धरणातील जुन्या आठवणींना उजाळा
12 Jun 2025
स्मृती मानधनाच्या रत्नागिरी जेट्स संघाचा पराभव
12 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !