मुंबई : सन ऑफ सरदार, यमला पगला दिवाना आणि जय हो या सारख्या चित्रपटांचे अभिनेते मुकूल देव यांचे निधन झाले. ते ५४ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात मुलगी सिया आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून त्यांची प्रकृती बिघडली होती. आईच्या निधनामुळे ते निराश झाले होते. त्यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले, अशी माहिती त्यांचे बंधू राहुल देव यांनी दिली. सन ऑफ सरदार २ चे चित्रीकरणाचे एकत्रित छायाचित्र काढण्यात येणार होते. त्यासंदर्भात फोन केला होता. त्याला त्यांनी उत्तर दिले नाही, असे त्यांचे मित्र विंदू दारा सिंग यांनी सांगितले. दरम्यान त्यांनी सुश्मिता सेन आणि शरद कपूर यांची भूमिका असलेला दस्तक चित्रपटात मुकूल देव यांनी प्रथम अभिनय केला होता. सन ऑफ सरदारमध्ये सलमान खान, अजय देवगण, जय हो मध्ये सलमान खासोबत आणि धर्मेद्र, सनी आणि बॉबी देओलसोबत यमला पगला दिवाना या चित्रपटात अभिनय केला होता.
Fans
Followers