काँग्रेस नेत्याच्या माहितीवरुनच ईडीची कारवाई?   

गदग : कर्नाटकाचे गृहमंत्री जी. परमेश्वर यांच्या पाठीशी संपूर्ण पक्ष उभा असल्याचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांनी सांगितले असले तरी, काँग्रेस नेत्याच्या माहितीवरुनच अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कारवाई केली, असा दावा केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केला आहे. विशेष म्हणजे, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना संबंधित व्यक्तीची माहिती आहे, असेही जोशी यांनी म्हटले आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी याद्वारे स्पष्ट होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
 
कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेसच्या एका गटाने ईडीला सर्व माहिती पुरवली होती. त्याआधारे, ईडीने परमेश्वर यांच्याशी संबंधित छापे घातले, असेही जोशी म्हणाले.  ईडीने बुधवार आणि गुरुवारी १६ ठिकाणी छापे घातले. यामध्ये परमेश्वर यांच्याशी संबंधित सिद्धार्थ इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि सिद्धार्थ वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. सोन्याच्या चोरट्या आयातीशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात ईडीने ही कारवाई केली. याच प्रकरणात कन्नड अभिनेत्री हर्षवर्धनी राण्या उर्फ राण्या राव हिला सोन्याची अटक करण्यात आली आहे. तिच्या बँक खात्यांची ईडीकडून तपासणी केली जात आहे. हवालामार्फत पैशांची देवाण-घेवाण झाली असा ईडीला संशय आहे. आर्थिक अफरातफर प्रतिबंधक कायद्याअंतर्गत ईडी कारवाई करत आहे.

Related Articles