भुजबळ आज घेणार मंत्रिपदाची शपथ?   

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ आज राज्याच्या मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. मुंबईच्या राजभवनात हा शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा होती. आता त्यांना मंत्रिपद देऊन त्यांची नाराजी दूर करण्यात येणार आहे. सोमवार रात्रीपासूनच शपथ सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे. 

मुंडेंचे खाते भुजबळांकडे?  

बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती. आता तेच खाते भुजबळांना देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

Related Articles