E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
(शस्त्र) संधीचा फायदा!
Wrutuja pandharpure
19 May 2025
धनंजय दीक्षित (dhananjay@kalyanicapital.com)
१६ मे रोजी संपलेल्या आठवड्यात, परदेशी तसेच भारतीय वित्तसंस्थांनी बाजारामध्ये सढळ हाताने पैसे अक्षरश: ओतले! परदेशी वित्तसंस्थांनी तब्बल १५,९२५.४१ कोटी रुपयांची निव्वळ खरेदी केली तर भारतीय वित्तसंस्थांनी त्याला ९५५७.१० कोटी रुपयांचा हातभार लावला. यात बारकाईने बघितल्यास असे लक्षात येईल की १२ तारखेला (शस्त्रसंधी झाल्याप्रीत्यर्थ) बाजारामध्ये जे उधाण आले, (व निफ्टी ने ९१६.७० अंकांची उसळी मारली) त्यादिवशी परदेशी आणि भारतीय वित्तसंस्थांची मिळून एकूण निव्वळ खरेदी २,६९४.८५ कोटी रुपये इतकी होती, तर या उलट १६ मे रोजी एकूण निव्वळ खरेदी १४,०१८.१४ कोटी रुपये होती; परंतु निफ्टी चक्क ४२.३ अंकानी पडला. यातून २ निष्कर्ष निघतात.
१. १२ मे रोजी खरेदी ही जास्त करून निर्देशांकातील शेअरमध्ये झाली असावी
२. १६ मे रोजी निर्देशांकेतर शेअरमध्ये मनमुराद खरेदी झाली; पण निर्देशांकातीलल शेअरकडे कोणी विशेष लक्ष दिले नाही.
अर्थातच सर्व शेअरमध्ये अग्रेसर होते, ते संरक्षण क्षेत्राशी निगडित कंपन्यांचे शेअर उदा.: एच ए एल, बी ई एल, बी डी एल, इ... भारतीय शस्त्रास्त्रे युद्धात कसोटीला पुरेपूर उतरली आहेत व त्यांच्या दर्जा बाबत कोणाच्याही मनात शंका उरलेली नाही. त्यामुळे ते बनविणार्या कंपन्यांवर संपूर्ण जगाचा विश्वास बसू लागला आहे, ही खरेतर अभिमान वाटण्याजोगी गोष्टच आहे. ‘मेड इन इंडिया’चा गाजावाजा सर्वदूर होतो आहे.
शस्त्रसंधी ची मुदत १८ मे पर्यंत होती. हा लेख छापला जाईल तेव्हा आपल्याला कळले असेलच की ही मुदत वाढली आहे अथवा नाही. बाजारामध्ये तसेही पुढील काही दिवस आर्थिक निकालांच्या रणधुमाळीचे असणार आहेत हे खाली दिलेली यादी बघितल्यावर आपल्या लक्षात येईलच. या सर्वांची गोळाबेरीज काय होईल, ते पुढील लेखात बघुयात.जानेवारी ते मार्च २०२५ ह्या आर्थिक तिमाही साठीचे तसेच 2024-25 या वर्षासाठीचे आर्थिक निकाल एप्रिल १ पासून जाहीर होत आहेत. त्यापैकी काही प्रमुख
कंपन्यांच्या निकालांच्या तारखा खालील प्रमाणे :
१९ मे : पॉवर ग्रिड, भारत इलेक्ट्रॉनिक्स, डी एल एफ, पी आय इंडस्ट्रीज, पेत्रोनेत, एन एल सी, गुजरात गॅस, आय आर बी इन्फ्रा, न्यू इंडिया ऍश्युरंस, फायजर 6 मे, गोदरेज कंझुमर, बी एस ई, पॉलीकॅब, हिंद पेट्रो, पेटीएम, रॅडिको खैतान, के ई आय, कन्साई नेरोलॅक, कजारिया सिरॅमिक.
२० मे : हिंडाल्को, सोलर इंडस्ट्रीज, मॅक्स हेल्थ, युनाइटेड स्पिरिट, टोरेंट फार्मा, डिक्सन टेक, झायडस लाइफ, एन एच पी सी, ग्लॅन्ड फार्मा, ई आय एच, व्हर्लपूल.
२१ मे : ओ एन जी सी, पावर फायनान्स, मॅनकाइन्ड, कोलगेट, रेल विकास निगम, नाल्को.
२२ मे : आय टी सी, सन फार्मा, ग्रासिम,
२३ मे : जे एस डब्ल्यू स्टील, ग्लेनमार्क, अशोक लेलँड
(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)
Related
Articles
रिक्षामध्ये पाच विद्यार्थ्यांनाच वाहतुकीस परवानगी
13 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
बटलरचे ४ धावांनी शतक हुकले
08 Jun 2025
हसत्या खेळत्या कुटुंबाचा सेल्फी ठरला अखेरचा
13 Jun 2025
यूट्यूबर जसबीर सिंग याचा कोठडीतील मुक्काम वाढला
08 Jun 2025
रिक्षामध्ये पाच विद्यार्थ्यांनाच वाहतुकीस परवानगी
13 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
बटलरचे ४ धावांनी शतक हुकले
08 Jun 2025
हसत्या खेळत्या कुटुंबाचा सेल्फी ठरला अखेरचा
13 Jun 2025
यूट्यूबर जसबीर सिंग याचा कोठडीतील मुक्काम वाढला
08 Jun 2025
रिक्षामध्ये पाच विद्यार्थ्यांनाच वाहतुकीस परवानगी
13 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
बटलरचे ४ धावांनी शतक हुकले
08 Jun 2025
हसत्या खेळत्या कुटुंबाचा सेल्फी ठरला अखेरचा
13 Jun 2025
यूट्यूबर जसबीर सिंग याचा कोठडीतील मुक्काम वाढला
08 Jun 2025
रिक्षामध्ये पाच विद्यार्थ्यांनाच वाहतुकीस परवानगी
13 Jun 2025
सुरुची सिंगला सुवर्णपदक
14 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये
12 Jun 2025
बटलरचे ४ धावांनी शतक हुकले
08 Jun 2025
हसत्या खेळत्या कुटुंबाचा सेल्फी ठरला अखेरचा
13 Jun 2025
यूट्यूबर जसबीर सिंग याचा कोठडीतील मुक्काम वाढला
08 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
भाषेचा अकारण वाद
2
अमेरिकेचा खोटेपणा उघड
3
यूट्यूबर जसबीर सिंग याचा कोठडीतील मुक्काम वाढला
4
स्वप्नवत् पुनरागमन
5
चौथे स्थान अजून लांब आहे..
6
सनदी अधिकारी ते चित्रपट नायक!