E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मार्केट यार्डच्या मुख्य बाजापेठेत मासळी बाजार उभारण्याचा निर्णय रद्द
Wrutuja pandharpure
09 May 2025
पुणे
: कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड येथील मुख्य बाजारामध्ये मासळी बाजार उभारण्याचा निर्णय गुरुवारी रद्द करण्यात आला. गुलटेकडी ऐवजी इतरत्र जागेत हा बाजार उभारण्याचा निर्णय कृषी उत्पन्न बाजार समितीने घेतला. अन्य जागेत हा बाजार उभा राहिल्यास त्याचे नियमन पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे करण्यात येणार आहे.
होलसेल मासळी विक्री व्यापारी संघाने गुलटेकडी येथील बाजार समितीच्या आवारांत मासळी बाजार उभारण्याचा प्रस्ताव बाजार समितीला दिला होता. समितीने हा ठराव मंजूर केला होता. मात्र, मुख्य बाजार आवारातील घटकांचा तसेच स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्याने या निर्णयाबाबत चर्चा करण्यासाठी बाजार समितीतर्फे गुरुवारी बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीला समितीचे सभापती दिलीप काळभोर, सचिव डॉ. राजाराम धोंडकर, संचालक प्रकाश जगताप, संतोष नांगरे, सहसचिव जी. सी. जेधे, एम. एन. पठारे, मासळी संघाचे कार्याध्यक्ष संतोष परदेशी, विजय परदेशी, सुनील परदेशी, अंबरनाथ परदेशी, शेखर परदेशी उपस्थित होते.
‘बाजार समितीने मासळी बाजारासाठी आवारांत जागा संपादित केली होती. मात्र, बाजार आवारातील घटकांचा तसेच स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्याने या जागेत मासळी बाजार उभारण्याचा निर्णय बैठकीत रद्द करण्यात आला आहे. शहरातील अन्य पर्यायी जागा मासळी विक्री व्यापारी संघाने सुचवाव्यात.
बाजार समिती जागा संपादित करून अत्याधुनिक सर्व सोयी असलेला मासळी बाजार उभा करेल. येथे मासळी आणि जलचर प्राण्यांचा बाजार सुरू करता येईल,’ असे सभापती दिलीप काळभोर आणि सचिव डॉ. राजाराम धोंडकर यांनी स्पष्ट केले.
बाजार आवारातील घटकांचा तसेच स्थानिक रहिवाशांचा विरोध असल्याने मार्केट यार्ड येथील जागेत मासळी बाजार उभारण्याचा निर्णय बैठकीत रद्द करण्यात आला आहे. शहरातील अन्य पर्यायी जागा मासळी विक्री व्यापारी संघाने सुचविल्यास तेथे मासळी बाजार उभा करून त्याचे नियमन करण्यात येईल.
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती
Related
Articles
वाचक लिहितात
05 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
ज्येष्ठ व्याघ्रसंवर्धक वाल्मिक थापर यांचे निधन
01 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
ज्येष्ठ व्याघ्रसंवर्धक वाल्मिक थापर यांचे निधन
01 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
ज्येष्ठ व्याघ्रसंवर्धक वाल्मिक थापर यांचे निधन
01 Jun 2025
वाचक लिहितात
05 Jun 2025
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
03 Jun 2025
विकास दर ६.५ टक्के राहणार
07 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
03 Jun 2025
पुणे विमानतळाला ’स्लॉट वाढीचा’ बूस्टर
01 Jun 2025
ज्येष्ठ व्याघ्रसंवर्धक वाल्मिक थापर यांचे निधन
01 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?