आदिवासींची शबरी योजना वादात   

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासींच्या रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी राज्य सरकारने आदिवासी विकास प्रकल्प आणि शबरी आदिवासी अर्थ व विकास महामंडळातर्फे ७८ कोटी खर्च करून १० हजार ४३० गाईंचे वाटप केले. मात्र, २५१ गाईंचा मृत्यू झाला. सरकारने वाटप केलेल्या बहुतांश गाई भाकड, आजारी होत्या. राज्य सरकारने एकप्रकारे आदिवासींची फसवणूक केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषदेत केला. दरम्यान, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी मृत गाईंची आकडेवारी मान्य करताना, योजनेत कोणतेही अनियमितता झाली नसल्याचे स्पष्ट केले.
 
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी गाई वाटप प्रकल्पात गैरव्यवहाराची चौकशी करून कारवाई करावी, अशी ९३ अन्वये सूचना दानवे यांनी परिषदेत मांडली. जिल्ह्यातील आदिवासींचे रोजगारासाठी होणारे स्थलांतर रोखण्यासाठी राज्य सरकारने आदिवासी विकास प्रकल्प आणि शबरी आदिवासी अर्थ व विकास महामंडळातर्फे गाई देण्याचा निर्णय घेतला. २०२२ ते २०२३ मध्ये १०,४३० गाईंचे वाटप केले. महामंडळातर्फे १० लीटर दूध देण्याचा दावा यावेळी करण्यात आला. मात्र, आदिवासींना दिलेल्या गाई या आजारी, अशक्त, भाकड होत्या. त्यामुळे १० लीटरचा दावा फोल ठरलाच, तसेच २५१ गायींचा मृत्यू झाला. गाईंची आरोग्य तपासणी केलेली नव्हती. परंतु, गायींचा मृत्यू झाल्यानंतर विमा मिळावा, याकरिता नियम डावलून अर्ज केले. 
 

Related Articles