E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर
Wrutuja pandharpure
14 Jun 2025
एडेन मार्करामचे नाबाद शतक
लंडन
: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्याच्या शुक्रवारी तिसर्या दिवशी दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज एडेन मार्करामच्या नाबाद शानदार शतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे. तिसर्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेच्या २ बाद २१३ धावा झाल्या होत्या. यात एडेन मार्कराम १०२ तर कर्णधार टेम्बा बावुमा ६५ धावांवर खेळत होता. आफ्रिकेला विजयासाठी केवळ ६९ धावांची आवश्यकता आहे.
मार्करामच्या आधी फक्त दोन फलंदाजांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत शतक झळकावले आहे. या आधी शतकी खेळी करणारे दोन्ही फलंदाज ऑस्ट्रेलियाचे आहेत. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला २८२ धावांचे लक्ष्य दिले होते. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खराब झाली. रायन रिकेल्टन लवकर बाद झाला. यानंतर, मार्करामने दक्षिण आफ्रिकेच्या डावाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत १५६ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. १०२ धावा करूनही तो अजूनही खेळत आहे. या डावात मार्करामने ११ चौकार मारले आहेत. मार्करामला कर्णधार टेम्बा बावुमाने चांगली साथ दिली. या दोघांनी तिसर्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी केली. यात बावुमा ६५ धावांवर खेळत आहे. तिसर्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने दोन विकेट गमावून २१३ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेला २७ वर्षांनंतर आयसीसी जेतेपद जिंकण्यासाठी फक्त ६९ धावांची आवश्यकता आहे.
मार्करामच्या आधी स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅव्हिस हेड यांनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामन्यात शतके झळकावली आहेत. दोन्ही खेळाडूंनी २०२३ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताविरुद्ध शतके झळकावली. स्मिथने १२१ धावांची खेळी केली. या डावात त्याने १९ चौकार मारले. तर हेडने १६३ धावांची खेळी खेळली होती.ऑस्ट्रेलियासाठी दुसर्या डावात मिचेल स्टार्कने अर्धशतक झळकावले. ऑस्ट्रेलियाने ७३ धावांत ७ विकेट गमावल्या. त्यानंतर अॅलेक्स कॅरीने ४३ धावांची खेळी खेळली. ऑस्ट्रेलियाने १४८/९ वरून २०७ धावांपर्यंत मजल मारली. मिचेल स्टार्कने १३६ चेंडूत ५८ धावांची नाबाद खेळी खेळली. जोश हेझलवूडने ५३ चेंडूत १७ धावा केल्या. शेवटच्या विकेटसाठी दोघांमध्ये ५९ धावांची भागीदारी झाली. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर आतापर्यंत १४७ कसोटी सामने खेळले गेले आहेत.
Related
Articles
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
नीलकंठेश्वर पॅनलचे उमेदवार जाहीर
13 Jun 2025
जपानला भारताने मागे टाकण्यावर शिक्कामोर्तब
12 Jun 2025
आपत्ती व्यवस्थापनासाठी महापालिका सज्ज
18 Jun 2025
पाकिस्तानात ‘ब्रिगेड ३१३’ कशी?
12 Jun 2025
नीटच्या उत्तरपत्रिकेत गैरव्यवहार?
12 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !