E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
चीनच्या रसायन कंपनीतील बळींची संख्या पाचवर
Samruddhi Dhayagude
28 May 2025
एकोणीस जखमी; सहा बेपत्ता
बीजिंग : चीनमधील रासायनिक संयंत्रातील भीषण स्फोटातील मृतांची संख्या पाच झाली असून १९ जखमी आहेत. बुधवारी मदतकार्य सुरू होते. सहाजण बेपत्ता असून त्यांचा शोध घेतला जात आहे.
शांगडोंग प्रांतातील वेईफंग शहरातील औद्योगिक भागात मंगळवारी प्रकल्पातील एका संयंत्रात भीषण स्फोट झाला होता. सफोटामुळे परिसरातील इमारतींच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या, दाट पांढर्या धुराचे लोट आकाशात उसळले होते. या संदर्भातील चित्रफिती समाज माध्यमांवर फिरल्या होत्या. मात्र, स्फोटाचे कारण उघड झालेले नाही.
हॉटेलच्या काचा फुटल्या
घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटरवरील हॉटेलमध्ये स्फोटाचे हादरे जाणवले होते. झांग लियू हा कर्मचारी भोजन ग्राहकांना देत असताना स्फोटामुळे हॉटेलच्या खिडक्याच्या फुटल्या. छताचा भागही कोसळला होता. दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नव्हते, असे त्याने सांगितले. घटनास्थळावरुन तीन किलोमीटवरील एका हॉटेलमध्ये अशाच प्रकारचा हादरा बसला होता. एका महिलेने सांगितले की, एखादा भूकंप झाल्याप्रमाणे जमीन हादरली होती. खिडक्यांच्या काचा फुटल्या होत्या. त्या शिवाय अन्य नुकसान झाले नसल्याचे झांग यांनी सांगितले.
लाल, पिवळा धूर बाहेर पडला
एका शालेय विद्यार्थ्याने स्फोटाची माहिती देताना सांगितले की, स्फोटानंतर संयत्रातून पिवळा आणि लाल धूर बाहेर पडला. त्याचा वासही विचित्र होता. यानंतर मुलांना मास्कचे वाटप करण्यात आले आणि तो काढू नका, असे बजावले होते.
प्रदूषणाची मात्रा किती ?
एका पर्यावरणवाद्याने सांगितले की, तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी रवाना केले आहे. प्रदूषणाबाबत पाहणी आाणि अहवालानंतर प्रदूषण किती झाले ? याचा मागोवा घेता येणे शक्य आहे.
खते आणि औषधांसाठी रसायन निर्मिती
गोओमी युडाओ रसायन कंपनीकडून रसायनिक प्रकल्प चालविला जात होता.खते आणि औषधांसाठी रसायनांची निर्मिती केली जात होेती. तेथे पाचशेहून अधिक कर्मचारी काम करत होते. स्फोटानंतर मदतकार्यासाठी अग्निशमन दलाचे सुमारे २३० कर्मचारी धावले. आता सीसीटीव्हीतून स्फोटाचे कारण शोधले जात आहे
Related
Articles
टिमविच्या बीसीए विद्यार्थ्यांकडून ‘साइबर क्राईम जनजागृती’
14 Jun 2025
कुकडी प्रकल्पात १०.६१ टक्केपाणीसाठा
18 Jun 2025
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण
12 Jun 2025
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
15 Jun 2025
मोदी सरकारचे विकासाला प्राधान्य
15 Jun 2025
श्रेयस अय्यरचा संघ मुंबई टी-२० लीगच्या अंतिममध्ये

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !