मुलाला पत्नीकडे द्यायला सांगून झाडल्या गोळ्या...   

श्रीनगर : पहलगामच्या बैसरण खोर्‍यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बंगळुरूच्या ३५ वर्षीय भारत भूषण यांचाही समावेश होता. आपल्या तीन वर्षाच्या मुलासाठी ते दहशतवाद्यांकडे दयेची भीक मागत होते; पण दहशतवाद्यांनी मुलाला पत्नीकडे द्यायला सांगून त्यांच्यावर निर्दयीपणे गोळ्या झाडल्या. पत्नी आणि मुलासमोर भूषण यांचा जीव गेला. 
 
भारत भूषण हे पर्यटनासाठी पत्नी आणि मुलासोबत पहलगाम येथे गेले होते. मंगळवारी दुपारी जेव्हा बैसरण खोर्‍यात दहशतवादी हल्ला झाला. त्यावेळी  भूषण कुटुंब एका तंबूच्या मागे लपले होते. मात्र, दहशतवादी तिथे पोहचला. त्याने नाव विचारले. भारत हे नाव सांगताच दहशतवाद्यानी मुलाला पत्नीकडे द्यायला सांगितले. त्यावेळी तेव्हा भारत म्हणाला, मला मूल आहे, मला मारू नका. भारत हे मुलासाठी दहशतवाद्याकडे दयेची याचना करत होते. मात्र, त्यांनी ऐकले नाही. 

दहशतवाद्याने त्याच्या डोक्यात गोळी झाडली

भारत यांची पत्नी डॉ. भूषण म्हणाली, आम्ही १८ एप्रिलला सुट्टीसाठी गेलो होतो. बैसरण हा आमचा शेवटचा थांबा होता. आम्ही तिथे पोनी राईडसाठी गेलो, मग अचानक गोळीबाराचा आवाज येऊ लागला. दहशतवाद्यांनी संपूर्ण मैदानात टप्प्याटप्प्याने हिंदू नागरिकांना वेचून मारले. हल्ला सुरू झाला तेव्हा लोकांना पळायला किंवा लपायला जागा नव्हती. सुरुवातीला आम्हाला वाटले की कदाचित वन्य प्राण्यांचा पाठलाग केला जात असेल. पण नंतर गोळीबाराचे आवाज जवळ येऊ लागले आणि आम्हाला समजले की हा दहशतवादी हल्ला आहे.
 

Related Articles