माजी आमदार अरुण जगताप यांचे निधन   

अहिल्यानगर : माजी आमदार व माजी नगराध्यक्ष अरुण जगताप यांचे शुक्रवारी पहाटे पुण्यातील खासगी रुग्णालयात निधन झाले. ते ६७ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, १ विवाहित कन्या, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जगताप यांना काही दिवसांपूर्वी अचानक त्रास झाल्याने पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार चालू असताना काल पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनामुळे नगर शहर व परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. आमदार संग्राम जगताप व जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांचे ते वडील होत.  जगताप यांच्यावर काल सायंकाळी येथील अमरधाम स्मशानभूमीत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. 

Related Articles