E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
दिग्वेश राठीने-अभिषेक शर्मामध्ये जोरदार भांडण
Samruddhi Dhayagude
22 May 2025
लखनौ : आयपीएल २०२५ च्या हंगामातील लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यात जोरदार राडा झाल्याचं पाहायला मिळाला. लखनौचा गोलंदाज दिग्वेश राठी आणि हैदराबादचा फलंदाज अभिषेक शर्मा सामना सुरु असताना भर मैदानात एकमेकांना भिडले. यावेळी पंचासह लखनौ आणि हैदराबादच्या इतर खेळाडूंना मध्यस्थी करावी लागली. दिग्वेश राठीने अभिषेक शर्माला बाद केल्यानंतर दोघांमध्ये काहीतरी बोलणे झाले. अभिषेक बाद झाल्यानंतर दिग्वेश सतत काहीतरी बोलत होता. यावेळी अभिषेक शर्माही त्याला नडला.
यादरम्यान अभिषेक आणि दिग्वेश एकमेकांवर हात उचलणार की काय?, असं क्रिकेट चाहत्यांना वाटले. परंतु तेवढ्यात ऋषभ पंत आला आणि त्याने दिग्वेशला मागे खेचले आणि त्याला समजावले. अभिषेक रागाने त्यांच्याकडे हातवारे करत मैदानाबाहेर गेला. दिग्वेश राठीचे केस मोठी आहेत. त्यामुळे अभिषेक शर्मा दिग्वेश राठीकडे रागाने बघत आणि केस पकडेल असे हातवारे करत मैदानाबाहेर गेल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. दरम्यान, सामना संपल्यानंतर, दिग्वेश आणि अभिषेक यांनी हस्तांदोलन केले आणि त्यांच्यात काही संवाद झाला. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला देखील अभिषेक आणि दिग्वेशचे दोघांचे बोलणे ऐकताना दिसले.
दिग्वेश राठी आणि अभिषेक शर्माच्या वादावर मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यंदाच्या आयपीएल हंगामात आतापर्यंत कोणत्याही खेळाडूला न झालेली शिक्षा दिग्वेश राठीला सुनावण्यात आली आहे. दिग्वेश राठीला एका सामन्यासाठी बंदी घालण्यात आली आहे. दिग्वेश आता लखनौ सुपर जायंट्सच्या पुढील सामन्यात खेळू शकणार नाही. तसेच मॅच फी पैकी ५० टक्के दंड म्हणून वसूल केली जाणार आहे. याशिवाय सध्या त्याच्या नावावर ५ डिमेरीट पॉईंट असल्यानं त्याचं गुजरात टायटन्सचे निलंबन करण्यात आले. दिग्वेश राठीवर यापूर्वी देखील आयपीएलकडून कारवाई करण्यात आली होती.
मात्र, त्यावेळी त्याला केवळ आर्थिक दंड आकारण्यात आला होता. सनरायझर्स हैदराबादचा अष्टपैलू खेळाडू अभिषेक शर्मालाही आयपीएलच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल त्याच्या सामना शुल्काच्या २५ टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. या हंगामात अभिषेकचा कलम २.६ अंतर्गत हा पहिलाच लेव्हल १ गुन्हा होता आणि त्यामुळे त्याला एक डिमेरिट पॉइंट मिळाला आहे. लेव्हल १ च्या आचारसंहितेचे उल्लंघन झाल्यास, मॅच रेफ्रीचा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असतो. यंदाच्या आयपीएलमध्ये दिग्वेश राठी बळी घेतल्यानंतर अनेक खेळाडूंसोबत भिडताना दिसला.
Related
Articles
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
15 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यासोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका
15 Jun 2025
बीबीए, बीसीए अतिरिक्त सीईटीच्या अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
14 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
15 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यासोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका
15 Jun 2025
बीबीए, बीसीए अतिरिक्त सीईटीच्या अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
14 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
15 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यासोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका
15 Jun 2025
बीबीए, बीसीए अतिरिक्त सीईटीच्या अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
14 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
मृतांची संख्या २७० वर
15 Jun 2025
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
15 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू
14 Jun 2025
यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यासोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका
15 Jun 2025
बीबीए, बीसीए अतिरिक्त सीईटीच्या अर्जांसाठी २० जूनपर्यंत मुदत
14 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
इस्रायलचा इराणवर हल्ला