चीनचे नाव घ्यायला जयशंकर घाबरतात   

काँग्रेसची अरुणालवरून टीका

नवी दिल्ली : चीनचे नाव घ्यायला ते घाबरतात, अशी टीका काँग्रेसचे खासदार मनीष तिवारी यांनी मंगळवारी परराष्ट्र मंत्री जयशंकर यांच्यावर केली. चीनने अरुणाचल प्रदेशातील ३० ठिकाणांची नावे बदलली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मी तुमच्या घरावरचे नाव बदलले तर, ते माझे होईल का ?  ? असा प्रश्न जयशंकर यांनी एका मुलाखतीत विचारला होता. त्याला तिवारी यांनी आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले, जयशंकर यांनी चिनच्या खोडसाळपणाला अतिशय मिळमिळीत उत्तर दिले आहे. सरकार आणि परराष्ट्र मंत्र्यांना शोभणारे असे ते नाही. तत्कालिन काँग्रेस सरकारने तामिळनाडूतील कच्चथावू बेट श्रीलंकेला दिल्याचे मुद्दा वारंवार भाजपकडून उकरून काढला जात आहे. त्याचा समाचार घेताना तिवारी म्हणाले, चीनचे नाव घ्यायला जयशंकर घाबरतात. एकीककडे कच्चथावू बेटाचा मुद्दा कठोरपणे मांडताना दुसरीकडे मात्र, चीनबाबत सौम्य भूमिका सरकार घेत आहे. अरुणाचल प्रदेशावर चीनने नावे बदलून आता दावा ठोकला आहे. त्याकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याची टीका त्यांनी केली.

Related Articles