फडणवीसांकडून आचारसंहितेचा भंग   

काँग्रेसची तक्रार

 
मुंबई, (प्रतिनिधी) : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा गैरवापर करून आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांची गृहमंत्री पदावरून तात्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. तसेच सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांची उमेदवारी रद्द करा, अशी तक्रारही काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी आयोजित एका बैठकीत सोलापूरचे भाजप उमेदवार राम सातपुते यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दूरध्वनी करुन एका समाजाच्या काही व्यक्तींवर कोव्हिड काळात दाखल केलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी केली व गृहमंत्री फडणवीस यांनीही ते गुन्हे मागे घेऊ, चिंता करण्याचे काही कारण नाही, असे आश्वासन त्या बैठकीत उपस्थितांना दिले. निवडणुकीच्या काळात अशा पद्धतीने प्रलोभन देणे, आश्वासन देणे हा आचारसंहितेचा भंग आहे.

Related Articles