भाजपकडून २५ कोटींची ऑफर : ऋतुराज झा   

नवी दिल्ली : भाजपमध्ये सामील होण्यासाठी मला २५ कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा गौप्यस्फोट आपचे आमदार ऋतुराज झा यांनी सोमवारी विधानसभेत केला. 
 
झा म्हणाले, रविवारी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा प्रस्ताव घेऊन काहींनी माझ्याशी संपर्क साधला. दहा आमदारांना घेऊन भाजपमध्ये सामील व्हा. आम्ही तुम्हाला प्रत्येकी २५ कोटी रुपये देऊ. तुम्हाला भाजप सरकारमध्ये मंत्री केले जाईल, असे त्यांनी सांगितले. दिल्लीचे सरकार उलथवून लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे एकमेव नेते आहेत ज्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दिल्लीत चार वेळा पराभव केला. २०१३, २०१५, २०२० विधानसभा निवडणुका आणि २०२२ एमसीडी निवडणुकांंमध्येेे भाजपचा पराभव झाला होता.त्यावर भाजप आमदार विजेंद्र गुप्ता म्हणाले की, आप आमदारांनी अनेकदा आरोप केले आहेत की, त्यांना पैशाची ऑफर देण्यात आली होती. सभागृहाच्या पावित्र्याचा वापर काहीही बोलण्यासाठी होता कामा नये. किती दिवस खोटे बोलणार? भाजपकडून ऑफर आली होती, तर त्याची तक्रार का करण्यात आली नाही?, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला.

Related Articles