मतदान न केल्यास बँक खात्यातून ३५० रुपये कापणार?   

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर समाजमाध्यमावर एक पोस्ट  प्रसिद्ध झाली आहे. जे मतदार लोकसभा निवडणुकीत मतदान करणार नाहीत, त्यांच्या बँक खात्यातून निवडणूक आयोगाकडून ३५० रुपये कापले जातील.  अशा आशयाची ही पोस्ट आहे. परंतु हा दावा पूर्णपणे खोटा आहे. अशा प्रकारची पोस्ट व्हायरल झाल्यानंतर पीआयबीने या दाव्याची सत्यता पडताळली. त्यामध्ये हा दावा पूर्णपणे खोटा असल्याचे स्पष्ट झाले. भारतीय निवडणूक आयोगाने असा कोणताही निर्णय घेतलेला नाही. अशा बातम्या प्रसारित करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला. लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचे मतदान १९ एप्रिल रोजी होणार आहे. तर दुसर्‍या टप्प्याचे मतदान २६ एप्रिल, तिसर्‍या टप्प्याचे ७ मे, चौथ्या टप्प्याचे १४ मे आणि पाचव्या टप्प्याचे मतदान २० मे रोजी होणार आहे. तसेच निकाल ४ जून रोजी जाहीर होणार आहे.

Related Articles