तोशखाना प्रकरणी इम्रान दांपत्याची १४ वर्षांची शिक्षा रद्द   

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशीरा यांची १४ वर्षांची शिक्षा न्यायालयाने सोमवारी रद्द केली आहे.  तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणी त्यांना शिक्षा ठोठावण्यात आली होती.सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी इम्रान दांपत्याला ३१ जानेवारी रोजी प्रत्येकी १४ वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली होती. राजकोषातील रकमेचा गैरवापर चैनी वस्तू खरेदीसाठी केला असा आरोप त्यांच्यावर ठेवला होता. त्यांनी शिक्षेला इस्लामाबाद उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायाधीश अमेर फारुख यांच्यासमोर अर्जावर सुनावणी झाली. यानंतर न्यायाधीशांनी दोघांची शिक्षा रद्द केली आहे.त्यामुळे त्यांना दिलासा मिळाला असून त्यांना जामीनही मंजूर केला आहे. त्यांच्या विरोधातील अर्जावर सुनावणी ईदनंतर केली जाईल, असे आदेश दिले आहेत.दरम्यान, तोशखाना प्रकरणातून इम्रान यांची सुटका झाली असली तरी अन्य प्रकरणात ते दोषीच असल्याने त्यांची तातडीने तुरुंगातून सुटका होणार नाही. इम्रान यांच्याप्रमाणे बुशीरा देखील अन्य प्रकरणात दोषी आहेत. त्यामुळे त्यांची सुटका होणार नाही. 

Related Articles