रुग्णालयाची नासधूस करून इस्रायलचे सैनिक माघारी   

पॅलेस्टिनी नागरिकांकडून माहिती

 
डेर अल बलाह : गाझातील प्रमुख रुग्णालयावर हल्ला करून त्याची नासधूस करून इस्रायलचे सैनिक माघारी गेल्याचे पॅलेस्टिनी नागरिकांनी सोमवारी सांगितले.दोन आठवड्यांपूर्वी शैफा रुग्णालयावर इस्रायली सैनिकांनी हल्ला चढविला होता. तेथे प्रचंड नासधूस केली होती. त्यानंतर ते माघारी गेले होते, असे नागरिकांनी सांगितले. सैनिक तेथून निघून गेल्यानंतर शेकडो नागरिकांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. तेथे पाहणी केली तेव्हा आत आणि बाहेर मृतदेह आढळून आले. गेल्या सहा महिन्यांपासून इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू आहे. एका कारवाईवेळी सैनिकांनी रुग्णालयावर छापा टाकला होता. त्यात हमास आणि अन्य दहशतवादी ठार झाले होते. कारवाई संपताच सैनिक तेथून निघून गेल्याचे लष्कराच्या वतीने सांगण्यात आले. 
 

Related Articles