चिनी अभियंत्यांच्या हत्येप्रकरणी १२ संशयितांना अटक   

इस्लामाबाद : पाकिस्तानातील वायव्य भागात पाच चिनी अभियंते प्रवास करत असलेले वाहन स्फोटाने उडवून दिल्याप्रक़रणी १२ नागरिकांना पाकिस्तानी पोलिसांनी अटक केली आहे.
गेल्या आठवड्यात वाहनावर आत्मघातकी हल्ला झाला होता. त्यात चीनचे पाच अभियंते आणि वाहनाचा चालक ठार झाला होता. अटक केलेल्या व्यक्तींनी आत्मघातकी हल्ल्यात प्रत्यक्ष भाग घेतला नसून त्यांनी हल्लेखोरांना मदत केली होती, आा संशयामुळे त्यांना अटक केली असल्याचे पोलिसांंनी सांगितले.  तो कोणत्या दहशतवादी गटाशी संबंधित आहेत ? याचा तपास केला जाणार आहे. सर्व संशयितांनी स्फोटकांनी भरलेले एक वाहन आणले होते. खैबर पख्तनुख्वा प्रांतात अन्य एका वाहनातून आलेल्या आत्मघातकी हल्लेखोराने चिनी अभियंते प्रवास करत असलेल्या वाहनाजवळ आपले वाहन धडकवले होते. तेव्हा भीषण स्फोटात चिनी अभियंत्यासह सहा जण ठार झाले होते. 

Related Articles