राहुल गांधींविरोधात आयोगाकडे तक्रार   

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘मॅच फिक्सिंग’च्या विधानावरुन भाजपने त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. तसेच, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्यात यावी, अशी विनंती केली आहे. केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी आणि पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण कुमार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल राहुल गांधी यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली. निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना पुरी म्हणाले की, राहुल गांधी यांनी रामलीला मैदानावरील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत.या आरोपात काहीच तथ्य नाही. त्यांचे आरोप आक्षेपार्ह असून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन करणारे आहे. राहुल यांनी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरही प्रश्न उपस्थित केला. पण, यात कोणतेही तथ्य नाही, असे सांगितले.

Related Articles