केजरीवाल यांच्यावर काँग्रेसमुळेच कारवाई   

विजयन यांचा आरोप; इंडिया आघाडीला तडा

 
कोझिकोडे : दिल्ली सरकारच्या मद्य धोरणातील गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची  चौकशी ईडीकडून व्हावी, अशी मागणी काँग्रेसने केली होती, असा आरोप केरळचे मुख्यमंत्री, माकप नेते पिनराई विजयन यांनी सोमवारी केला. त्याच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीला तडा गेल्याची चर्चा आता सुरू झाली आहे.
 
दिल्लीत इंडिया आघाडीने केजरीवाल यांच्या समर्थनासाठी लोकशाही वाचवा मेळावा नुकताच आयोजित केला होता. त्यात माकप, भाकपसह आघाडीतील घटक पक्ष मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. यानंतर विजयन यांनी केजरीवाल यांच्या अटकेला काँग्रेस जबाबदार असल्याचा आरोप करून खळबळ उडवून दिली आहे. पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसला थेट लक्ष्य केले आहे. अशी मागणी काँग्रेसने प्रथम केली होती. तसेच तक्रार देखील दाखल केली होती. आता काँग्रेस केजरीवालांचे समर्थन कशी काय करत आहे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 
 

Related Articles