महिलांवरील वादग्रस्त वक्तव्याबाबत घोष, श्रीनेत यांना आयोगाने फटकारले   

नवी दिल्ली : महिलांबाबत वक्तव्ये करताना तोंड सांभाळून करा, अशा शब्दात भाजपचे नेते दिलीप घोष आणि काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया श्रीनेत यांना निवडणूक आयोगाने सोमवारी फटकारले. दरम्यान, अशा प्रकारच्या वक्तव्यावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष आणि अतिरिक्त पाहणी यंत्रणा आयोग  उभी करणार आहे.
 
या संदर्भात दोन्ही नेत्यांची कान उघाडणी करणारी पत्र पाठवले आहे. या पत्राच्या प्रती दोन्ही नेत्यांच्या पक्ष प्रमुखांना आयोगाने पाठवल्या असून त्यांना काळजी घेण्याचे अवाहन केले आहे. सार्वजनिक व्यासपीठावर भाष्य करताना महिलांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचणार नाही. याबाबत पक्ष प्रमुखांनी दक्षता घ्यावी. तसे करणार्‍यांवर वचक ठेवावा. आदर्श आचार संहितेचा भंग पुन्हा दोन नेत्यांकडून पुन्हा होणार नाही, असे पाहावे, असे त्यात नमूद केले आहे. वक्तव्यानंतर प्रति वक्तव्ये केली जातात. अशी मालिका निरतंर सुरू राहते. त्यामुळे प्रथमपासून आपल्या नेत्यांना आवरावे. लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता लागू आहे. तिचा भंग होणार नाही. याची काळजी पक्ष प्रमुखांंनी घ्यावी. तशा सूचना नेते, कार्यकर्ते यांना द्याव्यात. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आयोगाने घोष आणि श्रीनेत यांची कान उघाडणी केलेल्या पत्राच्या प्रती पाठवल्या आहेत. 
 
घोष यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि श्रीनेत यांनी अभिनेत्री कंगना राणावत यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीवर टीका केली होती. याबाबत आयोगाकडे तक्रार दाखल झाली होती. या प्रकरणी त्यांना नोटीस बजावली होती. 
 

Related Articles