मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का?   

एस जयशंकर यांनी चीनला सुनावले

 
नवी दिल्ली : मी तुमच्या घराचे नाव बदलले, तर ते माझे होईल का? अरुणाचल प्रदेश हा भारताचा अविभाज्य भाग आहे. नाव बदलून काहीही होणार नाही. भारताचे सैन्य नियंत्रण रेषेवर तैनात असून, ते त्यांचे काम योग्यरित्या करतील, असा शब्दात परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी चीनला सुनावले. चीनने अरूणाचल प्रदेशातील विविध ३० ठिकाणांना नवीन नावे दिली असून, त्यांची चौथी यादी सोमवारी जाहीर केली. त्या पार्श्वभूमीवर जयशंकर म्हणाले, चीन अरुणाचल प्रदेशला जंगनान म्हणतो आणि त्यावर दक्षिण तिबेटचा भाग असल्याचा दावा करतो. चीनने अरूणाचल प्रदेशातील भौगोलिक नावांची चौथी यादी जाहीर केली. पण नावे बदलून काही साध्य होणार नाही. नाव बदलल्याने कोणताही प्रदेश आपला होत नाही. हा भाग भारताचाच आहे. या प्रदेशावरून  अनेकदा भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक चकमकी झाल्या आहेत.  
 

Related Articles