बीआरएस नेत्या कविता यांना न्यायालयीन कोठडी   

नवी दिल्ली : भारत राष्ट्र समितीच्या नेत्या आणि तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या कन्या के. कविता यांना येथील न्यायालयाने ९ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. दिल्लीतील उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित आर्थिक अफरातफर प्रकरणात कविता यांना १५ मार्च रोजी ईडीने अटक केली होती. याआधी सुनावलेली कोठडीची मुदत काल संपणार होती. त्यामुळे कविता यांना काल सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर करण्यात आले.  विशेष न्यायाधीश कावेरी बावेजा यांनी कविता यांना ९ एप्रिलपर्यंत कोठडी सुनावली.कविता यांच्या वकिलांनी वैद्यकीय कारणास्तव त्यांना घरचे जेवण, औषधे तसेच गादी, चप्पल, कपडे, बेडशीट, पुस्तके, ब्लँकेट, पेन, कागद देण्यात यावेत, अशी मागणी केली होती. न्यायालयाने ती मान्य करतानाच तिहारच्या तुरूंग अधीक्षकांना तसे निर्देश दिले आहे.

Related Articles