तळघरातील पूजा सुरूच राहणार   

ज्ञानव्यापी प्रकरण

 
नवी दिल्ली : वाराणसीच्या काशी विश्वनाथ मंदिराशेजारी असलेल्या ‘ज्ञानव्यापी’च्या तळघरातील पूजेस स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. तसेच, मशीद व्यवस्थापन समितीच्या अर्जावर काशी विश्वनाथ मंदिराच्या विश्वस्तांचे न्यायालयाने उत्तर मागवले आहेे.
 
सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्यायमूर्ती जे.बी. पार्डीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा पीठासमोर याबाबतचा अर्ज सुनावणीस होता. या पीठाने मशीद समितीच्या अर्जावर  पुजारी शैलेंद्र कुमार पाठक व्यास यांना ३० एप्रिलपर्यंत आपले म्हणणे मांडण्यास सांगितले आहे.
 
याआधी, उच्च न्यायालयाने २६ फेब्रुवारी मशीद व्यवस्थापन समितीचा अर्ज फेटाळून लावला होता. या अर्जाद्वारे ३१ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयाने दिलेल्या निर्णयास आव्हान देण्यात आले होते. मशीद समितीचा अर्ज फेटाळताना उच्च न्यायालयाने ज्ञानव्यापीतील पूजा-अर्चा थांबवण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा (१९९३) निर्णय बेकायदेशीर होता, असे निरीक्षण नोंदविले होते. वाराणसी जिल्हा न्यायालयाने ३१ जानेवारी रोजी ‘ज्ञानव्यापी’च्या दक्षिणेकडील तळघरात पूजा करण्याचा अधिकार पुजारी व्यास यांच्या कुटुंबाला दिला होता. या निकालानंतर तळघरात पूजेला सुरूवात झाली. 
 

Related Articles