इंदूर-पुणे गाडीच्या फेर्‍यात वाढ   

पुणे : उन्हाळी सुट्यांमुळे अनेक मार्गावरील रेल्वे गाड्यांना गर्दी वाढली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेवून विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढविला आहे. इंदूर-पुणे-इंदूर साप्ताहिक विशेष गाडीच्या आता १८ फेर्‍या होणार आहेत. इंदूर-पुणे साप्ताहिक विशेष गाडी २६ जूनपर्यंत धावणार आहे. ही गाडी नऊ वेळा पुण्यातून जाईल. तसेच इंदूर येथून नऊ फेर्‍या पुण्यासाठी होतील.  गाड्यांच्या वेळेत, रचनेत आणि थांब्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. इंदूर-पुणे प्रमाणेच तिरुपती-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष, साईनगर शिर्डी-तिरुपती साप्ताहिक विशेष, अजमेर-सोलापूर साप्ताहिक विशेष, सोलापूर-अजमेर साप्ताहिक विशेष, बिकानेर-साईनगर शिर्डी-बिकानेर साप्ताहिक विशेष व बिकानेर-साईनगर शिर्डी साप्ताहिक विशेष या गाड्यांच्या कालावधीतही वाढ करण्यात आली आहे. या गाड्यांचे आगाऊ तिकीट आरक्षण सुरू आहे. 

Related Articles