चहल-बोल्टच्या मार्‍यापुढे मुंबईची फलंदाजी कोलमडली   

राजस्तानपुढे अवघ्या १२६ धावांचे आव्हान

 
मुंबई : आयपीएलमध्ये सोमवारी मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्तान रॉयर्स यांच्यातील सामन्यात राजस्तानच्या युजवेंद्र चहल आणि ट्रेंट बोल्टच्या भेदक मार्‍यापुढे मुंबई इंडियन्सची भक्कम फलंदाजी कोलमडली. मुंबईला निर्धारित २० षटकांमध्ये फक्त १२५ धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईकडून हार्दिक पांड्याने सर्वाधिक ३४ धावांची खेळी केली, त्याशिवाय तिलक वर्माने ३२ धावा केल्या. राजस्तानकडून चहल आणि बोल्ट यांनी प्रत्येकी तीन तीन विकेट घेतल्या. राजस्तानला सामना जिंकण्यासाठी १२६ धावांचे सोप्पे आव्हान मिळाले आहे. 
 
बोल्टच्या ’रॉयल’ वादळात मुंबईच्या आघाडीच्या फलंदाजांची त्रेधातिरपीट झाली. रोहित शर्मा, नमन धीर आणि डेवाल्ड ब्रेविस यांना खातेही उघडता आले नाही. बोल्टने पहिल्या दोन षटकांत मुंबईच्या फलंदाजीला खिंडार पाडले. बोल्टच्या मार्‍यापुढे एकाही फलंदाजाला टिकाव लागला नाही.
 

चहलचा भेदक मारा  

 
अवघ्या २० धावांवर चार विकेट गमावल्यानंतर हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांनी मुंबईच्या डावाला आकार दिला.  हार्दिक पांड्या आणि तिलक वर्मा यांची जोडी जमली होती. चहलने हार्दिक पांड्या, तिलक वर्मा आणि गेराल्ड कोएत्जे यांना बाद केले. 
 

Related Articles