बीसीसीआयकडून आयपीएलच्या संघ मालकांना भेटीचे निमंत्रण   

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) १० आयपीएल संघांच्या मालकांना १६ एप्रिल रोजी अहमदाबाद येथे अनौपचारिक बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्याच्या बाजूला ही बैठक होणार आहे.   
 
बीसीसीआयच्या एका अधिकार्‍याने यावेळी बोलताना सांगितले की, आयपीएलमधील संघ मालकांना अनौपचारिक बैठकीसाठी आमंत्रित करण्यात आले आहे. या बैठकीचा कोणताही निश्चित अजेंडा नाही. आयपीएलचा दुसरा महिना सुरू आहे, त्यामुळे सर्व भागधारकांना एकत्र येण्याची ही चांगली वेळ आहे.
 
यावेळी या वर्षाच्या अखेरीस होणार्‍या मोठ्या लिलावाबाबत चर्चा होऊ शकते. यामध्ये खेळाडूंना त्यांच्या संघाशी जोडून ठेवणे आणि लिलावाच्या रकमेत संभाव्य वाढ या मुद्द्यावर चर्चा होऊ शकते. सध्या संघ खेळाडूंवर १०० कोटी रुपये खर्च करू शकतात. बीसीसीआयचे सचिव जय शाह, अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि आयपीएलचे अध्यक्ष या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Related Articles