केदार जाधव, देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीने चर्चांना उधाण   

भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता 

 
पुणे : भारताचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट झाल्याची समोर आले आहे. केदार जाधव ह्यांची ही खासगी भेट होती. परंतु, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाल्याने याचे वेगवेगळे अर्थ काढण्यात येत आहेत. केदार जाधव याने देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली तेव्हा त्यावेळी तेथे आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे हे देखील उपस्थित होते. 
 
दरम्यान, याआधीही केदार जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये भेट झाली होती. परंतु त्याने आता पुण्यात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. केदार जाधव सोबत यावेळी भाजपचे अन्य नेते देखील उपस्थित होते. केदार जाधव आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. मात्र यांच्यात काय चर्चा झाली, याबद्दल माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आता केदार जाधव देखील भाजपमध्ये प्रवेश करणार का, याची चर्चा होत आहे.

Related Articles