व्हॉट्सऍप कट्टा   

आयुष्य छान आहे 
आयुष्य छान आहे
थोडे लहान आहे!
रडतोस काय वेड्या
लढण्यात शान आहे!
उचलून घे हवे ते!!
दुनिया दुकान आहे
जगणे निरर्थ म्हणतो
तो बेईमान आहे!
आयुष्य छान आहे
थोडे लहान आहे!
रडतोस काय वेड्या
लढण्यात शान आहे!!
आर्यन जाधव, लोकमंगल विद्यालय,
 
नागेवाडी-कुशी-सातारा.
मो.: ९८९००१२७५०
---
समस्या प्रत्येकाच्याच आयुष्यात येत असतात.. वाईट, नकोसे प्रसंग घडत असतात.. मात्र त्यातून खचून जाऊन नकारात्मक मानसिकता तयार न करता सकारात्मकता टिकवून ठेवलीच पाहिजे आणि जो आहे त्याच मार्गावर कार्यरतही राहीलं पाहिजे.. कारण एक वाईट अनुभव आला की संपलं सगळं असं नसतं ना.. जीवनाच्या वाटेवर वेळोवेळी असे प्रसंग येतच असतात.. त्यांची तिच तर नियती आहे.. म्हणून काय सकारत्मकता नाहीशी होत नसते.. उलट नकारात्मक विचारांनी असलेल्या कामावरही परिणाम होतो.. सरता काळ हा प्रत्येक दुःखांवरचं औषध असतो.. म्हणून अपयश किंवा दु:खाने खचून न जाता पुढचा प्रवास सुरुच ठेवला पाहीजे...
--
पाण्याचा तळ स्वच्छपणे दिसला की, पाण्यात उतरण्याची भीती वाटत नाही. तसंच, माणसाच्या मनाचा तळ समजला की, सहवासाची भीती वाटत नाही. फक्त लक्षात ठेवायचं-तळ गाठला की थोडा गाळ दिसणारच. त्याकडे दुर्लक्ष करण्याइतके आपले मन नितळ हवे!
--
सगळं व्यवस्थित करून पण काहीच व्यवस्थित होत नसेल 
तर समजून जा की तुमच्या आयुष्याचा न्यूझीलंड झालाय...
--
चम्प्या : तू उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस..?
चिंगी : सहा..
चम्प्या : चूक...फक्त १
कारण १ सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसतेस...
चिंगी : मस्त सूपर जोक आहे हा...
मग ती चिंगी आपल्या मैत्रिणीला हा जोक सांगायला जाते..
सांग गं मयुरी तू उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस..?
मयुरी : नऊ..
चिंगी : तू ६ बोलली असतीस तर मी तुला एक मस्त जोक सांगणार होते.
 

Related Articles